प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : शहरातील मुख्य रस्ता तसेच अनेक गल्ली-बोळांमध्ये विना परवाना बांधकाम साहित्य खुलेआम रस्त्यावर टाकण्यात येत असल्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी होत असून दुचाकी व चारचाकी वाहनांच्या पार्किंगची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.या प्रकारामुळे नागरिकांना दररोज त्रास सहन करावा लागत आहे.विशेषतः मेन रोडसारख्या वर्दळीच्या ठिकाणी वाळू,खडी, लोखंडी सळ्या आदी साहित्य स्वतः च्या जागेत न ठेवता थेट रस्त्यावरच ठेवले जात असल्याने वाहनचालकांना अरुंद जागेतून मार्ग काढावा लागत आहे.त्यामुळे अपघाताचा धोका वाढला असून पादचाऱ्यांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे.नागरिकांच्या म्हणण्यानुसार,संबंधित बांधकामांसाठी आवश्यक परवानगी घेतली आहे की नाही याची तपासणी होत नसल्याचे दिसून येते.पालिका प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी,तसेच रस्त्यावर अडथळा निर्माण करणारे साहित्य तात्काळ हटवावे,अशी मागणी होत आहे.वाहतूक कोंडी आणि पार्किंग समस्येमुळे व्यापारी, शाळकरी विद्यार्थी तसेच रोजंदारीवर काम करणारे नागरिक त्रस्त झाले असून,प्रशासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या