प्रतिष्ठा न्यूज
सांगली दि. 11 : अंत्योदय आणि मानवतावादाचे प्रणेते, भारतीय जनसंघाचे संस्थापक तसेच एकात्म मानववादाचे विचारवंत श्रद्धेय पंडित दीनदयाळजी उपाध्याय यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी पंडित दीनदयाळजी उपाध्याय यांच्या ‘एकात्म मानववाद’ आणि ‘अंत्योदय’ या विचारसरणीचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाची गंगा पोहोचविणे, सर्वसमावेशक आणि मूल्याधिष्ठित राजकारण करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे मत व्यक्त करण्यात आले.
या प्रसंगी माजी आमदार दिनकर तात्या पाटील, प्रदेश कार्यकारिणी सदस्या नीता केळकर, जैन प्रकोष्ठ प्रदेश उपाध्यक्ष रावसाहेब पाटील, किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार, ज्येष्ठ नेते श्रीकांत शिंदे, कामगार आघाडीचे अविनाश मोहिते, जिल्हा सरचिटणीस विशाल पवार, विश्वजीत पाटील, जिल्हा उपाध्यक्षा हेमलता मोरे, नगरसेवक मोहन वाटवे, चेतन सूर्यवंशी, रवींद्र सदामते, नगरसेविका योगिता राठोड, गीता पवार, मंडल अध्यक्ष राहुल नवलाई, शुभम देसाई, भालचंद्र बक्षी, प्रशांत राठोड, सुनील भोसले, प्रशांत गौंडाजे, सुरज पवार, गौस पठाण, राजू मद्रासी, प्रशांत गडदे, सुजित राऊत, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या