प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : तासगाव तालुक्यातील चिंचणी जिल्हा परिषद मतदारसंघाचे नूतन जिल्हा परिषद सदस्य अक्षय (भैय्या) पाटील यांनी सांगली येथील हौसाई वृद्धाश्रमात भेट घेऊन वयोवृद्ध महिलांची विचारपूस केली.
यावेळी खासदार रामदासजी आठवले युथ फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संदेशभाऊ भंडारे, हौसाई वृद्धाश्रमाचे उपाध्यक्ष जयवंत माळी उपस्थित होते. वृद्धाश्रमाच्या वतीने जिल्हा परिषद निवडणूकीत जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्याने विजयी झाले बद्धल सत्कार करण्यात आला. तासगावचे माजी आमदार दिनकरआबांचा नातू अक्षयभैय्या मनमिळाऊ आणि कसलाही गर्व नसलेले व्यक्तिमत्व असल्याने त्यांना सगळी मदत करणार आणि त्यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे मत संदेशभाऊ भंडारे यांनी व्यक्त केले. यावेळी चिंचणीचे अजय पाटील, हौसाई वृद्धाश्रमाचे अध्यक्ष अध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, अधीक्षक रेखा माळी आदी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या