प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव :कृषि उत्पन्न बाजार समिती,तासगाव येथे आज सकाळी ११ वाजता बाजार आवारातील सेलहॉलमध्ये नव्या बेदाण्याच्या सौद्यांना उत्साहात सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी १० आडत व्यापाऱ्यांकडे नव्या मालाची मोठ्या प्रमाणात आवक झाली.एकूण १०,१२० बॉक्स (१५ गाड्या) म्हणजे सुमारे १५० टन बेदाण्याची विक्री झाली.हिरव्या बेदाण्यास प्रतिकिलो २९० ते ३९१ रुपये,तर पिवळ्या बेदाण्यास २७० ते ३६५ रुपये दर मिळाल्याची माहिती उपसभापती रामचंद्र सत्तु जाधव यांनी दिली. समाधानकारक दर मिळाल्याने बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.दुपारी १ नंतर २५ आडत व्यापाऱ्यांचे नियमित बेदाणा सौदे सुरू झाले.जानसी ट्रेडर्स,जयशक्ती ट्रेडर्स,सिद्धार्थ ट्रेडर्स,ऋषिकेश ट्रेडर्स, बनशंकरी ट्रेडर्स,श्री गणेश ट्रेडिंग कंपनी,पायल ट्रेडर्स,गौरीशंकर ट्रेडर्स, तनुजा ट्रेडर्स,शिंदे ट्रेडर्स आदी व्यापाऱ्यांकडे नव्या मालाची खरेदी-विक्री पार पडली.नव्या बेदाणा हंगामाचा शुभारंभ सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे संचालक सुरेश (भाऊ) रामराव पाटील,उपसभापती रामचंद्र सत्तु जाधव,संचालक धनाजी नारायण पाटील,मुकुंद सुबराव ठोंबरे, राजाराम गुंडा पाखरे,अंकुश सदाशिव माळी,व्यापारी संचालक सुदाम लक्ष्मण माळी यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी महाराष्ट्र, कर्नाटक व इतर राज्यांतील खरेदीदार व्यापारी,आडते व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या मालाला योग्य दर मिळण्यासाठी तासगाव बाजार आवारात प्रत्यक्ष सौद्यामध्येच विक्री करावी,असे आवाहन सभापती युवराजदादा उर्फ सुनिल भानुदास पाटील,उपसभापती रामचंद्र सत्तु जाधव व प्रभारी सचिव रविंद्र बापू माने यांनी केले.नव्या हंगामाच्या दमदार सुरुवातीमुळे तासगाव बाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या