प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:तासगांव कारखान्याच्या मालमत्तेच्या हस्तांतरणाचे सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण होण्यास कालावधी लागल्याने यंदाचा गळीत हंगाम सुरू करता आला नाही मात्र कारखाना मालमत्तेचे हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण झाली असून स्थावर व जंगम मालमत्तेवर भारती एनर्जी अँड शुगर्स या कंपनीची नोंदणी झाली आहे अशी माहिती भारती शुगरचे मार्गदर्शक महेंद्र लाड व कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर डी पाटील यांनी दिली.
यावेळी लाड व पाटील म्हणाले गळीत हंगाम घेण्यासाठी व विस्तारिकरण करण्यासाठी राज्य व केंद्र सरकारचे काही आवश्यक परवान्यांचे लवकरच हस्तांतर होणार आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या तज्ञांनी दोन वेळा मशिनरींची पाहणी केली असून विस्तारीकरण प्रकल्प अहवाल तयार केला आहे.वित्तीय संस्थांनी आवश्यक अर्थसाहाय्य प्रकरणास तत्वतः मान्यता दिली आहे.प्रकल्प अहवालानुसार प्रत्यक्ष कामकाजास लवकरच सुरुवात होणार आहे.पुढील गळीत हंगाम वेळेत सुरू करण्याच्या दृष्टीने सर्व ती उपाययोजना केली आहे.चालू गळीत हंगामाबाबत कारखाना प्रशासन सकारात्मक होते. मात्र कारखाना मालमत्ता हस्तांतरण होण्यास विलंब झाला.कारखाना मशिनरीची चाचणी घेण्यात बराच वेळ गेला.कामगार आणि ऊस तोडणी यंत्रणा सज्ज होती.गाळप हंगामाला उशीर होत असल्याने आमच्या भारती शुगरच्या अन्य दोन युनिट कडे तोडणी यंत्रणा वर्ग करावी लागली.तासगाव कारखाना विस्तारी करणं बरोबर पुढील गळीत हंगामात पूर्ण क्षमतेने चालू करण्यासाठी यंत्रणा काम करीत आहे. आमची अन्य नागेवाडी आणि डफळापूर येथील दोन्ही युनिट कार्यक्षमतेने सुरू आहेत.तासगाव कारखाना हे तिसरे युनिट पुढील हंगामात सुरू करून कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांना दिलासा देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे अशी माहिती ही त्यांनी दिली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या