गगनबावडा : गगनबावडा येथील ग. गो. जाधव महाविद्यालयाचे वाणिज्य विभागप्रमुख व उपप्राचार्य डॉ. संदीप पानारी यांनी थायलंड (पटाया–बँकॉक) येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत सक्रिय सहभाग नोंदवला. परिषदेत त्यांनी साधन व्यक्ती म्हणून संशोधन पेपर सादर केला तसेच “Effective Advertising and Brand Management in the Digital Age” या त्यांच्या पुस्तकाचे प्रकाशन झाले. यावेळी त्यांना Academic and Research Excellence Award ने गौरविण्यात आले. थम्मासात विद्यापीठ, बँकॉक येथे झालेल्या या परिषदेमुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक प्रतिष्ठेत भर पडली असून, यानिमित्त महाविद्यालयात डॉ. पानारी यांचा यथोचित गौरव करण्यात आला.
डॉ. संदीप पानारी यांचा आंतरराष्ट्रीय पातळीवर शैक्षणिक गौरव
By -
फेब्रुवारी ०६, २०२६
0
प्रतिष्ठा न्यूज / तुकाराम पडवळ
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या