प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : धारदार हत्याराचा धाक दाखवून अपहरण करुन ऑनलाईन ॲपद्वारे फसवणूक करुन लुटणारी ४ आरोपींची टोळी ४ तासाचे आत जेरबंद करण्यात आली. त्यांच्याकडून एका मोटार सायकलीसह १,००,०००/- रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
*जेरबंद करण्यात आलेल्या संशयितांची नावे अशी*
१) महंमदवाहीद इमाम मुल्ला, रा. माणीकनगर रेल्वे पंचाटर्स, मिरज
२) अविनाश ऊर्फ रितेश शिवाजी कुरणे, रा. माणीकनगर, जनवाडे प्लॉट, मिरज (परागंदा)
३) लतीफ ख्वोंता शेख, रा. जूना हरीपूर रोड, नुराणी मस्जीदजवळ, मिरज
४) राजेश चंद्र गुजराती, रा. माणीकनगर, जनवाडे प्लॉट, मिरज
५) राहील राजू शेख, रा. समतानगर, गल्ली नं. ०१, मिरज
*गुन्ह्याची थोडक्यात रहकीकत :-*
मा. श्री. संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली, मा. श्रीमती कल्पना बारवकर, अपर पोलीस अधिक्षक, सांगली च मा. श्री. प्रणिल गिल्डा, उपविभागीय पोलीस अधिकारी, मिरज विभाग यांनी विशेष पथक तयार करून विशेषतः मालमत्तेविरुध्दचे गुन्हे करणारे इसमांची माहीती घेवून त्यांचेवर योग्य ती कड़क कायदेशीर कारवाई करणेवाचत वेळोवेळी आदेशीत व मार्गदर्शन केले आहे.
सदर आदेशाप्रमाणे संदीप शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक, प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज यांनी तात्काळ कारवाई करीत मालमत्तेविरुध्दचे गुन्हे करणारे इसमांचाचत माहीती उपलब्ध करुन त्यांचेचर योग्य ती प्रभावी कायदेशीर कारवाई करण्यासाठी पोलीस ठाणेकडील डि.बी. पथकाकडील अधिकारी व अंमलदार यांना सूचित केले होते.
दि. ०३.०२.२०२६ रोजी यातील फिर्यादी राजीवच माटीन देवासीया, रा. चौगुले प्लॉट, जनवाडे मळा, समतानगर, मिरज हे त्यांचे होंडा मोपेड गाडीवरुन कृपामायी हॉस्पीटल ते समतानगर असे जात असताना एमएसईबी सबस्टेशनजवळ मोटारसायकलवरुन ट्रीपलसीट आलेल्या अज्ञात इसमांनी फिर्यादीचे मोपेड गाडीस धडक देवून फिर्यादीस शिवीगाळी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व धारदार चाकूचा धाक दाखवून फिर्यादीचा मोबाईल, आधारकार्ड व पॅनकार्ड मागून घेवून फिर्यादीचे अपहरण करून त्यांना बामणी गावचे पलीकडे नदीजवळ कच्च्या रस्त्याला घेवून जावून तेथे आधीच वांचलेल्या आणखी दोन अज्ञात साथीदारांसह फिर्यादीस पुन्हा चाकूचा धाक दाखवून धमकावून फिर्यादीचे परवानगी शिवाय फिर्यादी यांचे मोचाईलमध्ये केडीटबी नावाचे फायनान्स ॲप इन्स्टॉल करून सदरचे ॲपद्वारे फिर्यादीचे नावे कर्ज मंजूर करून घेवून फिर्यादीचं गुगल पे ॲप वरुन ९८,०००/- रु. त्रयस्थ इसमाचे खात्यावर ट्रान्सफर करून फिर्यादीची फसवणूक केलेची माहीती महात्मा गांची चौक पोलीस ठाणे, मिरजचे पोलीस प्रशासनास माहीती मिळाली होती. सदर अपहरण करुन फसवणूक केलेल्या घटनेचा महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे गु.र.नं. ४७/२०२६, भारतीय न्याय संहीता कलम ३१८(४), १४०(३), १३८, ११५(२), ३५२(२), ३५२, ३(५) अन्वये आपहरण, फसवणूक इत्यादी अनुषंगाने गुन्हा दाखल करुन संदीप शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक, प्रभारी -महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज यांनी पोलीस ठाणेकडील डि.बी. पथकाकडील अधिकारी व अंमलदार यांना तात्काळ सदर गुन्ह्याचे घटनास्थळी जावून तांत्रिक माहीती संकलीत करुन तिचे विश्लेषन करुन सदर फसवणूकीचा तात्काळ छडा लावणेधाचत आदेशीत केले होते. त्याप्रमाणे महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील नमूद डी.ची. पथकाने तात्काळ कारवाई करीत सदर गुन्हयाचे घटनास्थळी जावून तेथील तांत्रिक माहीती संकलीत करुन तसेच यातील फिर्यादी यांचेकडून पडलेल्या घटनेवेळची इत्यंभूत माहीती घेवून सदर फसवणूक करणारे संशयीतांचा शोध घेवून गुन्हा उघडकीस आणण्याचे अयक प्रयत्न सुरु केले होते.
सदर गुन्हयाचे तपासादरम्यान संदीप शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक, प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज हे उपलब्ध तांत्रिक माहीतीवरुन अज्ञात संशयीत इसमांचा मागोवा घेत असताना त्यांना, संशयीत इसम नामे
१) महंमदवाहीय इमाम मुल्ला, रा. माणीकनगर रेल्वे प्रयाटर्स, मिरज, २) अविनाश ऊर्फ रितेश शिवाजी फुरणे, रा. माणीकनगर, जनवाडे प्लॉट, मिरज, ३) लतीफ सयोंजा शेख, रा. जूना हरीपुर रोड, नूराणी मस्जीदजवळ, मिरज, ४) राजेश चंदू गुजराती, रा. माणीकनगर, जनचाहे प्लॉट, मिरज, ५) राहील राजू शेख, रा. समतानगर, गल्ली नं. ०१, मिरज यांनीच सदरचा अपहरण करुन फसवणूक केलेचा प्रकार केला असलेबाबत खात्रीशीर गोपनीय माहीती प्राप्त झालेने संदीप शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक, प्रभारी - महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज यांनी तात्काळ महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील डी. बी. पथकास रवाना करून सदर संशयीत इसमांना ताब्यात घेवून त्यांचेवर योग्य ती कारवाई करणेचे आदेश दिले. त्याप्रमाणे महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील डी.ची. पथकाने फिर्यादी पोलीस ठाणेस आल्यापासून चार तासाचे आत नमूद संशयीत इसमांपैकी चार इसर्माना शिताफीने ताब्यात घेवून यातील फिर्यादी यांचेकडून खात्री केली असता सदरच्या संशयीत इसमांनीच फिर्यादी यांचे अपहरण करून फसवणूक केली असल्याचे निष्पन्न झालेने त्यांना सदर गुन्हयाचे तपासकामी अठक केली आहे. सदर संशयीत इसमांना मा. न्यायालयासमक्ष हजर केले असता त्यांना दि. ०५.०२.२०२६ रोजीपर्यंत मा. व्यायालयाने पोलीस कोठडी मंजूर केली आहे. सदर गुन्हयाचा तपास मा. वरीष्ठांचे मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरच हे करीत असून यातील संशयीत नामे १) अविनाश ऊर्फ रितेश शिवाजी कुरणे, रा. माणीकनगर, जनचाहे पॉट, मिरज, २) लतीफ ख्वॉजा शेख, रा. जूना हरीपुर रोड, नूराणी मस्जीदजवळ, मिरज व ३) राहील राजू शेख, रा. समतानगर, गाली नं. ०१, मिरज हे पोलीस रेकॉर्डवरील शरीराविरुद्ध गुन्हे करणारे सराईत गुन्हेगार आहेत.
नागरीकांनी अशा प्रकारच्या फसवणूकीला बळी पडू नये तसेच कोणीही अशा प्रकारे चमकावून पैसे अथवा इतर वस्तूंची मागणी केल्यास तात्काळ डायल ११२ या नंबरवर संपर्क करुन अशा टोळीविरुध्द पोलीस प्रशासनास कायदेशीर तक्रार देण्याचे सांगली जिल्हा पोलीस दलातर्फे आवाहन करण्यात येत आहे.
*कारवाई करणारे पोलीस अधिकारी आणि अंमलदार*
मा. श्री. संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली
मा. श्रीमती कल्पना चारवकर, अपर पोलीस अधिक्षक, सांगली
मा. श्री. प्रणिल गिल्या, उपविभागीय पोलीस अधिकारी, मिरज विभाग मिरज
श्री. संदीप शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक, प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज यांचे मार्गदशांनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरय, पोलीस हेडकॉन्स्टेबल अभिजीत धनगर, सचिन कुंभार, पोलीस नाईक नानासाहेब चंदनशिवे, पोलीस कॉन्स्टेबल बसवराज कुंदगोळ, चिनोद चव्हाण, मोहसिन टिनमेकर, अमोल तोडकर, राजेंद्र हारगे,
चालक श्रेणी पोलीस नाईक देवानंद नागरगोजे
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या