प्रतिष्ठा न्यूज
मिरज प्रतिनिधी : प्रजापिता ब्रह्मकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालयास 90 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आणि महाशिवरात्री निमित्त मिरजेत प्रथमच शिव अनुभूती महोत्सव कार्यक्रम अंतर्गत शांती यात्रा,36 फुट शिवलिंग दर्शन, 12 ज्योतिर्लिंग दर्शन व सहस्त्र शिवलिंग दर्शन तसेच त्रिदिवसीय राजयोग शिबीर इत्यादी कार्यक्रम दि. 8 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी पर्यंत न्यू ओ 2 गार्डन, सांगलीकर मळा, मिरज येथे आयोजित केले आहे.
यात दि. 8 फेब्रुवारी रोजी शांती यात्रा काढली जाईल याची सुरुवात पाटील हौद- कमान वेस- न्यू o2 पार्क- मनोज शिंदे बंगला- सन्मित्र कॉलनी-लोकमान्य कॉलनी-रमा उद्यान -श्री कृष्ण मंदिर शेवट या मार्गातून काढली जाणार आहे. यात विश्व शांतीचे संदेश सांगणारे फलक आणि चित्र रथ तसेच हजारोच्या संख्येने लोक विविध भागातून उपस्थित राहणार आहेत.
तसेच मंगळवार व बुधवार दि. 10 व 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 ते सकाळी 10 पर्यंत व सायंकाळी 5 ते रात्री 9 पर्यंत प्रमुख आकर्षण म्हणून 36 फूट शिवलिंग दर्शन, 12 ज्योतिर्लिंग दर्शन व सहस्त्र शिवलिंग दर्शन दाखवण्यात व माहिती सांगण्यात येणार आहे हे पाहण्यासाठी सर्वाना मोफत प्रवेश दिलेल्या वेळेत आहे
तसेच दि. 12, 13 व 14 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 ते 8 व सायंकाळी 7 ते 8 या वेळेत मोफत राजयोग शिबीर घेतले जाणार आहे.
तरी लाखोंच्या संख्येने ईश्वरीय प्रेमी बंधू भगिनीनी या महापवित्र भव्य आणि दिव्य मेळ्याचा लाभ घ्यावा असे जाहीर आवाहन ब्रम्हकुमारीज मिरज सेंटरच्या मुख्य संचालिका मा निवेदिता बेहेनजी तसेच मा उर्मिला बेहेन, मा संतोषी बेहेन यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या