प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : गांजा विक्री करणारे २ आरोपी जेरबंद करून त्यांच्याकडून ७ किलो १७५ ग्रॅम वजनाचा ३,१५,,२५०/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांनी केली.
आरोपीचे नांव पत्ता
१) सोहेल लालुखान पठाण, वय २० वर्षे, रा. कैकाडी गल्ली, हिंदु धर्मशाळेच्या पाठीमागे, मिरज.
२) हुसेन बादशाहा सय्यद, वय २७ वर्षे, रा. कैकाडी गल्ली, हिंदु धर्मशाळेच्या पाठीमागे, मिरज.
याबाबत मिळालेली माहिती अशी,
मा. पोलीस अधीक्षक, संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस अंमली पदार्थ तस्करी, विक्री, वाटप व वितरण करणारे इसमांची माहिती काढून त्यांचेवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक, जयदिप कळेकर व स्टाफ यांचे एक पथक तयार करुन अंमली पदार्थ तस्करी, विक्री, वाटप व वितरण करणारे इसमांची माहिती काढून त्यांचेवर कारवाई करण्याच्या सुचना दिल्या होत्या.
त्या अनुशंगाने दिनांक ०३/०२/२०२६ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा पोलीस निरीक्षक जयदिप कळेकर यांचे पथकामधील पोना / सुशिल मस्के, पोकों / ऋतुराज होळकर आणि पोकों / सुमित सुर्यवंशी यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, हद्दपार इसम नामे हुसेन बादशाहा सय्यद व त्याचा मेव्हणा सोहेल पठाण, दोन्ही रा. कैकाडी गल्ली, मिरज हे मोटार सायकलवरुन म्हैशाळ रोडवरील उड्डाणपुलाजवळ गांजा माल विक्री करणेकरीता येणार आहेत.
नमुद पथक मिळाले बातमीप्रमाणे, म्हैशाळ रोडवरील उड्डाणपुलाजवळ सापळा लावून थांबले असता दोन इसम मोटार सायकलवरुन येवून थांबलेले दिसले. त्यावेळी पथकातील स्टाफने सदर हद्दपार इसम हुसेन सय्यद असल्याचे ओळखल्याने लागलीच सहा. पोलीस निरीक्षक जयदिप कळेकर व पथकाने त्यांना पळून जाणेची संधी न देता त्यांना ताब्यात घेवून त्यांना त्यांची नावे गाये विचारता त्यांनी त्यांची नावे अनुक्रमे १) सोहेल लालुखान पठाण, वय २० वर्षे, रा. कैकाडी गल्ली, हिंदु धर्मशाळेच्या पाठीमागे, मिरज. २) हुसेन बादशाहा सय्यद, वय २७ वर्षे, रा. कैकाडी गल्ली, हिंदु धर्मशाळेच्या पाठीमागे, मिरज असे सांगितले. सहा पोलीस निरीक्षक, जयदिप कळेकर यांनी हुसेन बादशाह सय्यद यास जिल्हा स्थलसिमा हद्दीत प्रवेश करणेबाबत तसा कोणताही आदेश अगर सक्षम प्राधिका-याची परवानगी असल्याबाबत विचारणा केली असता त्यांनी ती नसल्याचे सांगितले. सहा पोलीस निरीक्षक जयदिप कळेकर यांनी त्यांना मिळाले बातमीची हकीकत सांगुन त्याचे अंगझडतीचा उददेश कळवून पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता, मोटार सायकलवर दोघाच्या मथे असलेल्या सोहेल पठाण याचे कब्जातील प्लॅस्टिकच्या पोत्यात वरील वर्णनाचा तयार गांजा माल मिळून आला. त्यांना सदर गांजा मालाबाबत विचारणा केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. सहा पोलीस निरीक्षक, जयदिप कळेकर यांनी सोहेल पठाण यास विश्वासात घेवून त्याचेकडे चौकशी केली असता तो व त्यांचा सोबत असले हुसेन सय्यद याने सदरचा गांजा माल जादा दराने विक्री करणेकरीता आणला असल्याची कबुली दिली.
लागलीच सहा. पोलीस निरीक्षक, जयदिप कळेकर यांनी गांजा माल व ताब्यातील मोटार सायकल पंचासमक्ष जप्त केली आहे.
सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी मिरज शहर पोलीस ठाणेचे ताब्यात देण्यात आले असून त्यांचेवर वरीलप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मिरज शहर पोलीस ठाणे करीत आहेत.
*कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार*
मा. पोलीस अधीक्षक श्री. संदीप घुगे, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर
यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव झाडे, स्था. गु. अ. शाखा, सांगली सहा पोलीस निरीक्षक, जयदिप कळेकर, स्था. गु. अ. शाखा, सांगली पोलीस उप निरीक्षक कुमार पाटील, स्था. गु. अ. शाखा, सांगली पोलीस उप निरीक्षक महादेव पोवार, स्था. गु. अ. शाखा, सांगली पोहवा / अमोल ऐदाळे, अतुल माने, आमसिध्द खोत, रणजीत जाधव, पोना / सुशिल मस्के, श्रीधर बागडी,
पोकों/ ऋतुराज होळकर, सुमित सुर्यवंशी, रोहन घरते, पोकों / अभिजीत पाटील, अजय पाटील, सायबर पोलीस ठाणे, सांगली
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या