प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा : शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर संलग्न पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव महाविद्यालय, गगनबावडा येथील सामाजिक शास्त्र विभागाच्या वतीने “कायदा निर्मितीची प्रक्रिया” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन गुरुवार, दि. २६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले.
कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात मा. अॅड. मल्लिकार्जुन सी. बंदरे यांनी बीजभाषण करताना “मानवी जीवनात कायद्याचे महत्त्व” या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी समाजातील शिस्त, न्याय आणि नागरिकांचे हक्क व कर्तव्ये यासाठी कायद्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले.
दुसऱ्या सत्रात मा. अॅड. व्ही. पी. गुरव यांनी “कायद्याचा उगम व विकास” या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत कायद्याचा झालेला विकास, तसेच शासनव्यवस्थेत कायद्याचे स्थान याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. टी. एम. पाटील होते. तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून प्रा. डॉ. सतीश देसाई (अध्यक्ष, आनंदी शिक्षण प्रसारक मंडळ) व प्रा. डॉ. विद्या देसाई (सचिव) उपस्थित होते. कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. ए. आर. गावकर यांनी कार्यशाळेचे नियोजन व आयोजन केले.
या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना कायदा निर्मिती प्रक्रिया, कायद्याचे महत्त्व व त्याचा सामाजिक जीवनावर होणारा परिणाम याबाबत मौल्यवान मार्गदर्शन मिळाले.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन महाविद्यालयाच्या सामाजिक शास्त्र विभागाच्या वतीने करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या