तासगाव : तालुक्यातील शिरगाव (वि.) येथे सातबारा उताऱ्यावर दस्ताची नोंद करून देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना संजय शंकर पवार (वय ५६, रा. शिरगाव) या खासगी इसमाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले.
तक्रारदाराच्या वडिलांनी गहाणस्वरूपी दिलेल्या जमिनीची ‘रिकन्व्हेन्स पत्राद्वारे’ नोंद सातबाऱ्यावर करण्यासाठी आरोपीने स्वतःसाठी व शिरगाव (वि.) येथील तलाठी यांच्यासाठी सुरुवातीला १५ हजार रुपयांची मागणी केली होती.तडजोडीअंती १० हजार रुपये देण्याचे ठरले.त्यानुसार सोमवारी (दि. २३) तलाठी कार्यालय, शिरगाव (वि.) येथे सापळा रचून आरोपीला रंगेहाथ पकडण्यात आले.
या प्रकरणी तासगाव पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे अपर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती यास्मीन इनामदार,पोलीस उप अधीक्षक (ACB सांगली) व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
या कारवाईमुळे महसूल विभागातील गैरप्रकारांवर मोठा आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या