प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालय,तासगावच्या शालेय आंतरवासिता उपक्रम तासगाव मधील विविध शाळांमध्ये प्राचार्य डॉ.बी.एम.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आजपासून प्रारंभ झाला.सदरच्या शाळांमध्ये उद्घाटनप्रसंगी गटवार केलेल्या डिजिटल बॅनरचे अनावरन करण्यात आले.त्याचबरोबर संत गाडगे महाराज यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.त्यांच्या जीवनावर आधारित सर्व प्रशिक्षणार्थीनीने आपल्या गटाप्रमाणे असलेल्या शाळेत भित्तिपत्रिकेचे प्रकाशन केले. स्वामी रामानंद भारती विद्यामंदिर व जुनिअर कॉलेज,तासगाव या शाळेत प्राचार्य,प्रकाश हाके यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शक
यांच्या प्रा.प्रमोद शेंडगे उपस्थितीत कार्यक्रम झाला. चंपाबेन वाडीलाल ज्ञानमंदिर तासगाव येथील मुख्याध्यापक मुकुंद जोग यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शक डॉ.डी.टी.खजूरकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.महाराष्ट्ररत्न वि.स.पागे कृषी विद्यानिकेतन तासगाव या शाळेत प्राचार्य,एस.आर. सानप यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शक प्रा.अंकुश पंडित यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.श्रीमंत विनायकराव उर्फ बाबासाहेब पटवर्धन कन्या प्रशाला तासगाव येथील मुख्याध्यापिका सौ.सुरेखा शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शक डॉ. ए.एस.चिखलीकर यांच्या उपस्थितीत झाला. आंतरवासिता उपक्रम प्रमुख डॉ.एल.व्ही.भंडारे यांच्या नियोजनाने ह्या आंतरवासिता उपक्रमास प्रारंभ झाला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या