प्रतिष्ठा न्यूज
संग्रामपूर प्रतिनिधी : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेतर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार संग्रामपूर तालुका पत्रकार संघाला 22 फेब्रुवारी रोजी कर्जत (जि. रायगड) येथे आयोजित झालेल्या भव्य सोहळ्यात प्रदान करण्यात आला. यंदा 355 तालुक्यांमधून निवड झालेल्या पाच आदर्श संघांमध्ये संग्रामपूर तालुक्याने स्थान मिळवून आपल्या पत्रकारितेचा दर्जा आणि समाजाभिमुख कार्याची दखल घेतली आहे. संग्रामपूर तालुक्याचा विशेष उल्लेख त्याच्या समाजाभिमुख पत्रकारितेसाठी केला जातो, जिथे राजकारणात टिकाटिपणीपेक्षा विकासाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले जाते. यामध्ये जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह राजपूत राणा यांच्या सहकार्याचा महत्त्वपूर्ण वाटा आहे.
महाराष्ट्र राज्यातील 355 तालुक्यांमधून निवड होत पहिल्या पाच मध्ये स्थान मिळवत जिल्ह्याचे शेवटचे टोकावरील सातपुडा पर्वत रांगेच्या पायथ्याशी असलेल्या ग्रामीण अविकसित संग्रामपूर तालुक्याने शासन व जनतेच्या हिताचे दृष्टीने विविध उपक्रम राबवून आदर्श पुरस्काराचा मान पटकावला.ह्या यशामुळे संग्रामपूर तालुक्यासह बुलढाणा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. समाजाभिमुख व विकासाभिमुख पत्रकारितेमुळे संग्रामपूर तालुक्याचा विशेष उल्लेख केला जातो. राजकारणाला केवळ टिके पुरते मर्यादीत न ठेवता विकासासाठी प्रेरक लिखाण करणारी पत्रकारिता हे येथील वैशिष्ट्य असल्याची दखल या पुरस्कारातून घेण्यात आली.
अ.भा. मराठी पत्रकार परिषद ही 82 वर्षापासून पत्रकारांच्या हितासाठी कार्यरत असलेली मातृसंस्था आहे. परिषदेच्या वतीने दरवर्षी उल्लेखनीय कार्यासाठी विविध आदर्श पुरस्कार दिले जातात. यंदाचा वसंतराव काणे ‘आदर्श तालुका पत्रकार संघ’ पुरस्कार संग्रामपूर तालुका पत्रकार संघास मिळाल्याने अमरावती महसूल विभागातून एकमेव बुलढाणा जिल्ह्याचा गौरव झाला.कर्जत (रायगड)येथील सोहळ्यात मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, अध्यक्ष मिलिंद आष्टीवकर, मावळचे खासदार शिरंग बारणे, माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार महेंद्र थोरवे, वृत्तवाहिनी प्रतिनिधी मंदार फणसे, राजकीय विश्लेषक हेमंत देसाई, प्रदेश प्रतिनिधी चंद्रकांत बर्र्देे, जिल्हाध्यक्ष रणजीत राजपूत, रायगड प्रेस क्लब अध्यक्ष अभय आपटे, राहुल देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
राज्य पातळीवरील हा पुरस्कार सन्मानपत्र, मानचिन्ह, शाल व श्रीफळ अशा स्वरूपात मान्यवरांचे हस्ते प्रदान करण्यात आला.
संघाची एकजूट यशाचे गमक....
पुरस्कार स्वीकारण्यासाठी संग्रामपूर तालुका पत्रकार संघाची संपूर्ण टीम उपस्थित होती. ह्यामध्ये अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील दांदळे, जिल्हा समन्वयक पंजाबराव ठाकरे, जिल्हा कार्याध्यक्ष अझहर अली, ज्येष्ठ मार्गदर्शक रामेश्वर गायकी, केंद्रीय जिल्हा कार्यकारी सदस्य श्याम देशमुख, तालुका कार्याध्यक्ष राजेंद्र धर्माधिकारी, सचिव विवेक राऊत, उपाध्यक्ष शेख अब्दुल, उपाध्यक्ष कासम सुरत्ने, कोषाध्यक्ष वासुदेव दामधर, तालुका संघटक श्याम इंगळे, मोहन सोनोने, विभागीय संघटक डॉ. संतोष लांडे, जिल्हा समिती, जिल्हा समिती सदस्य सागर कापसे,सदस्य आकाश पालीवाल, हल्लाकृती समिती सदस्य स्वप्निल देशमुख, डिजिटल मीडिया तालुका अध्यक्ष गोपाल धर्मळ, उपाध्यक्ष भगवान पाखरे, ज्ञानेश्वर आतकरे, विठ्ठल निंबोळकार, नंदू पाटील खानझोड आदी पदाधिकारी उपस्थित होते.
*ग्रामीण पत्रकारितेची राज्यस्तरीय दखल*
संग्रामपूर हा आदिवासी बहुल व मागास तालुका म्हणून ओळखला जात असला, तरी येथील पत्रकारितेने शहरी तालुक्यांनाही मागे टाकत वेगळेपण सिद्ध केले आहे. सामाजिक प्रश्न, जनहिताचे मुद्दे आणि ग्रामीण भागातील समस्यांना सातत्याने वाचा फोडत केलेल्या कार्याची ही राज्यस्तरीय पावती मानली जात आहे. डिजिटल युगात स्पर्धा वाढली असली तरी ग्राउंड रिपोर्टिंग व स्थानिक प्रश्नांवरील भक्कम मांडणीमुळे ग्रामीण पत्रकारिता आजही प्रभावी ठरत असल्याचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी सांगितले. परिषदेच्या अकरा अध्यक्षांच्या भाषणांचा संग्रह प्रकाशित करण्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले.
*पुरस्कार म्हणजे जबाबदारी’*
“पुरस्कार हा केवळ सन्मान नसून जबाबदारी आहे. संग्रामपूर तालुका पत्रकार संघाने ही जबाबदारी जपत समाजाभिमुख पत्रकारिता अधिक बळकट करावी,” अशी अपेक्षा जिल्हाध्यक्ष रणजीत राजपूत यांनी व्यक्त केली. विजेत्या संघानेही ही अपेक्षा पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या