प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : शिवनेरी कला,क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, तासगाव यांच्या रौप्य महोत्सव दिनानिमित्त आयोजित शिवनेरी चषक 2026
या क्रीडा स्पर्धेत स्वराज्य फाउंडेशनने उत्कृष्ट कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेत उल्लेखनीय खेळ दाखवत राष्ट्रीय खेळाडू आदित्य शितल येसुगडे-पाटील यांना उत्कृष्ट खेळाडू म्हणून सायकल हे बक्षीस प्रदान करण्यात आले. मात्र आदित्य यांनी केवळ खेळातच नव्हे, तर आपल्या कृतीतूनही खऱ्या अर्थाने खिलाडी वृत्तीचे दर्शन घडवले.त्यांनी मिळालेली सायकल स्वतःकडे न ठेवता,आपल्या फाउंडेशनमधील होतकरू व गरजू राष्ट्रीय खेळाडू कु.सोफिया बुरान मुल्ला हिला भेट स्वरूपात प्रदान केली.
आदित्य यांच्या या समाजभिमुख व प्रेरणादायी कृतीमुळे क्रीडाक्षेत्रात माणुसकी, सहकार्य आणि प्रेरणा यांचे सुंदर उदाहरण निर्माण झाले आहे. या उल्लेखनीय कार्याबद्दल स्वराज्य फाउंडेशनचे अध्यक्ष,उपाध्यक्ष तसेच सर्व संचालक मंडळाच्या वतीने कु. आदित्य येसुगडे-पाटील यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले असून त्यांच्या पुढील क्रीडा वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या