प्रतिष्ठा न्यूज
सांगली : सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत गतवेळेच्या तुलनेत भाजपा सदस्यांची या निवडणुकीत निवडून आलेल्या उमेदवारांची संख्या कमी असली तरी सत्ता महायुतीचीच येईल, असा विश्वास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य व पंचायत सदस्य यांच्या सत्कार प्रसंगी ते सांगली येथील खरे मंगल कार्यालयात बोलत होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले, राजकारणात संख्येपेक्षा समन्वय महत्त्वाचा असतो. मागच्या निवडून आलेल्या भाजपा सदस्यांच्या तुलनेत या निवडणुकीत निवडून आलेल्या उमेदवारांची संख्या जरी कमी असली तरी 11 भाजप, 6 राष्ट्रवादी, 7 शिवसेना,1 जनसुराज्य व 1 रयत क्रांती असे मिळून 31 संख्याबळ होत असून ते काँग्रेस 11, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार 18 आणि शिवसेना 1 यांच्या बेरजेच्या संख्येपेक्षा जास्त आहे. त्यामुळे सांगली जिल्हा परिषदेवर महायुतीचाच अध्यक्ष असेल. आता जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोणाचा होईल ते सर्वाशी चर्चा करूनच ठरविण्यात येईल असे ते म्हणाले.
सत्ता स्थापनेसाठी ते अध्यक्षपद कोणालाही मिळू शकते किंवा पाच वर्षासाठी कालावधी सामान न्यायाप्रमाणे ठरविण्यात येईल असे त्यांनी सुचविले.


टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या