प्रतिष्ठा न्यूज
सांगली : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या वतीने श्री. नंदकुमार बेडसे सो.अध्यक्ष महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांची शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली घेतली भेट.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना दोन वर्षात शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक केल्यानंतर. राज्यात शिक्षक संवर्गातून पदोन्नतीने पदे भरण्याच्या प्रक्रियेत शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.
राज्यातील पहिली ते आठवीच्या वर्गाला अध्यापन करणाऱ्या शासकीय निमशासकीय असंख्य शिक्षकांना टीईटी, सिटीईटी परीक्षा दोन वर्षात उत्तीर्ण होणे बंधनकारक केली आहे. राज्यातील पहिली ते आठवीच्या वर्गाला अध्यापन करणारे अनेक सेवाजेष्ठ शिक्षक पदोन्नतीसाठी पात्र आहेत अशा सेवाजेष्ठ शिक्षकांना पदोन्नतीने पदोन्नती मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, केंद्र समन्वय, विस्तार अधिकारी, वीषय शिक्षक पदांना सीटीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शिक्षण संस्थातील शिक्षक भरतीसाठी पवित्र प्रणालीमार्फत शिक्षक पात्रता परीक्षा सीटीईटी टीईटी घेण्यात येते. सदर परीक्षा उत्तीर्ण होण्याकरता अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती, विमुक्त व भटक्या जमाती व इतर मागासवर्ग व दिव्यांग यांच्यासाठी पाच टक्के गुणाची सवलत म्हणजेच उत्तीर्ण होण्यासाठी 55% गुण असणे आवश्यक आहे तसेच माजी सैनिक, शहीद सैनिकाच्या पत्नी व त्यांचे कुटुंबीय यांना 15 टक्के गुणाची सवलत देण्यात येते म्हणजेच उत्तीर्ण होण्यासाठी 45 टक्के गुणाची आवश्यकता आहे.
याप्रमाणेच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शिक्षण संस्था मधील ज्या शिक्षकांचे सेवा 15 वर्षे व त्यापेक्षा जास्त सेवा झालेली आहे अशा सेवा जेष्ठ शिक्षकांच्या वयाचा, मानसिकतेचा, अभ्यासक्रमाचा विचार करून उत्तीर्ण होण्यास 15 टक्के गुणाची सवलत देण्यात यावी म्हणजे सीटीईटी, टीईटी परीक्षा उत्तीर्ण होण्यास किमान 45 टक्के गुण करण्यात यावी अशी सवलत दिल्यास कार्यरत शिक्षकांना ही परीक्षा उत्तीर्ण करू शकतील. या संदर्भात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,पुणे चे अध्यक्ष मा. बेडसे साहेब (भाप्रसे) यांच्या समवेत चर्चा झाली असून त्यावर उचित कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले. व सदर बाबीवर सकारात्मकता दर्शवली आहे
सदर शिष्टमंडळामध्ये महाराष्ट्र राज्य पदवीधर शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष मनोज मराठे अलिबाग शिक्षक पतपेढीचे विद्यमान चेअरमन निलेश साळवी शिक्षक परिषदेचे मुरुड तालुका उपाध्यक्ष हेमकांत गोयजी यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या