प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:गांधी रिसर्च फाउंडेशन, जळगाव यांच्या वतीने आयोजित गांधी विचार संस्कार परीक्षा 2025-26 मध्ये संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालयाने उल्लेखनीय यश संपादन करत शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.
या परीक्षेत महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी कु.सारिका अधिकराव पाटील हिने सांगली जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवत उज्ज्वल कामगिरी केली,तर कु.सुमेधा अशोक सुतार हिने जिल्हा द्वितीय क्रमांक पटकावून महाविद्यालयाच्या यशात भर घातली. तसेच प्राध्यापक गटामध्ये डॉ.अर्चना शांतिनाथ चिखलीकर यांनी सांगली जिल्हा द्वितीय क्रमांक मिळवून महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.या घवघवीत यशाबद्दल पुरस्कारप्राप्त विद्यार्थिनी व प्राध्यापकांचे सर्वत्र अभिनंदन होत असून,महाविद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि संस्कारप्रधान वातावरणाचे हे द्योतक मानले जात आहे.या यशाबद्दल प्राचार्य डॉ.बी. एम.पाटील,डॉ.लक्ष्मी भंडारे,डॉ. देवदत्त खजूरकर,डॉ.अर्चना चिखलीकर, प्रा.अंकुश पंडित,प्रा. प्रमोद शेंडगे तसेच प्रशासकीय कर्मचारी संजय कुंभार,हणमंत वाघमारे, सौ.अस्मिता साळी आणि बी.एड. प्रथम व द्वितीय वर्षातील प्रशिक्षणार्थींनी आनंद व्यक्त केला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या