प्रतिष्ठा न्यूज/ तुकाराम पडवळ
गगनबावडा : गगनबावडा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये राष्ट्रीय काँग्रेसने सर्वच मतदारसंघांत निर्विवाद वर्चस्व सिद्ध करत दणदणीत विजय मिळवला आहे.
तालुक्यातील सर्व काँग्रेस उमेदवार विजयी झाले असून, भाजप–शिवसेना महायुतीच्या उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागला आहे.
गगनबावडा जिल्हा परिषद गटातून काँग्रेसचे संभाजी शांताराम पाटणकर यांनी महायुतीचे उमेदवार आनंदा पाटील यांचा निर्णायक पराभव केला.
असळज पंचायत समिती गणात काँग्रेसचे राजेश पाटील यांनी संदीप पाटील यांच्यावर स्पष्ट आघाडी घेत विजय मिळवला.
तिसंगी जिल्हा परिषद मतदारसंघात काँग्रेसच्या ॲड. सोनाली विलास पाटील यांनी सौ. कल्पना एकनाथ शिंदे यांचा पराभव केला.
तिसंगी पंचायत समिती गणात अमर केशव कांबळे (काँग्रेस) यांनी संजय मारुती कांबळे यांना पराभूत केले.
असंडोली गणात काँग्रेस समर्थित उमेदवाराने महायुतीच्या उमेदवारावर मात करत विजय मिळवला.
धुंदवडे गणातही काँग्रेसच्या सौ. शुभांगी संकपाल यांनी सौ. महानंदा म्हसकर यांचा पराभव केला.
‘लाडकी बहीण’ काँग्रेसच्या बाजूने
या निवडणुकीत महिला मतदारांचा, विशेषतः ‘लाडकी बहीण’ घटकाचा कल स्पष्टपणे काँग्रेसच्या बाजूने राहिल्याचे निकालातून दिसून आले. विकासकामे, स्थानिक प्रश्नांवरील सातत्यपूर्ण संपर्क आणि कार्यकर्त्यांचे मजबूत जाळे याचा फायदा काँग्रेसला झाला.
तालुक्यात काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व
या निकालामुळे गगनबावडा तालुक्यात काँग्रेसचे निर्विवाद राजकीय वर्चस्व प्रस्थापित झाले असून, महायुतीला मोठा आत्मपरीक्षणाचा धक्का बसला आहे.
येणाऱ्या काळात तालुक्याच्या राजकारणाची दिशा काँग्रेस ठरवणार, हे या निकालाने स्पष्ट केले आहे.
चौकट :बंडू आप्पा उर्फ पांडुरंग पडवळ हे तालुक्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असून, डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक, सांगसाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तसेच विविध संस्थांचे संस्थापक आहेत.
कालच त्यांच्याशी माझा संपर्क झाला होता. गगनबावडा तालुक्यातील निवडणुकीबाबत चर्चा करताना, तालुक्यातील सर्वच काँग्रेस उमेदवार निवडून येण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली होती. त्यांचा हा अंदाज व अभ्यास शंभर टक्के खरा ठरला.
चौकट : काही मतदारांकडून असा सवाल उपस्थित केला जात आहे की, यावेळी काँग्रेसला मिळालेल्या मोठ्या विजयाच्या पार्श्वभूमीवर ईव्हीएमबाबत कोणताही आक्षेप वा संशय व्यक्त केला जात नाही, मग पराभवाच्या वेळी मांडले जाणारे ईव्हीएम घोटाळ्याचे आरोप केवळ राजकीय सोयीसाठीच असतात काय, असा प्रश्न उपस्थित होतो.
निकाल जनतेच्या कौलाचे प्रतिबिंब असतील, तर विजय–पराभव दोन्ही वेळा तोच निकष लावला गेला पाहिजे, अशी भावना मतदारांतून व्यक्त होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या