प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुक 2026 तालुका तासगाव ची मतमोजणी उद्या दि. 09/02/2026 रोजी सकाळी 10.00 वाजता बहुउद्देशीय हॉल, तहसिल कार्यालय तासगाव येथे होणार आहे.EVM मतमोजणी करीता 20 टेबल लावलेले आहेत. तसेच टपाली मतदानाच्या मोजणी करीता 02 टेबल लावलेले आहेत. सकाळी 10.00 वाजता प्रथम टपाली मतदानाची मोजणी सुरु होईल, त्यानंतर EVM ची मतमोजणी सुरु करण्यात येईल.EVM मतमोजणी च्या 12 फे-या होणार असून प्रत्येक फेरीला एका गणाची मतमोजणी खालीलप्रमाणे होईल -
प्रथम फेरी-22 मांजर्ड गटातील 43 पेड गण
दुसरी फेरी- 22 मांजर्ड गटातील 44 मांजर्ड गण
तिसरी फेरी-23 सावळज गटातील 45 वायफळे गण
चौथी फेरी-23 सावळज गटातील 46 सावळज गण
पाचवी फेरी -24 विसापूर गटातील 47 विसापूर गण
सहावी फेरी -24 विसापूर गटातील 48 बोरगाव गण
सातवी फेरी - 25 येळावी गटातील 49 येळावी गण
आठवी फेरी - 25 येळावी गटातील 50 वासुंबे गण
नववी फेरी -26 चिंचणी गटातील 51 चिंचणी गण
दहावी फेरी - 26 चिंचणी गटातील 52 कुमठे गण
अकरावी फेरी - 27 मणेराजुरी गटातील 53 सावडे गण
बारावी फेरी - 27 मणेराजुरी गटातील 54 मणेराजुरी गण
टपाली मतदानाची मोजणी करीता 595 पाकीटे प्राप्त झाली आहेत. तसेच दि. 09/02/2026 रोजी सकाळी 9.59 मि. पर्यंत प्राप्त होणारी सर्व पाकीटे टपाली मतदानाची मोजणी करीता घेण्यात येतील.EVM मतमोजणी करीता प्रत्येक फेरीला त्या फेरीतील गणाचे उमेदवार / मतमोजणी प्रतिनिधी यांना मतमोजणी कक्षात प्रवेश देणेत येईल.त्याव्यतीरीक्त इतर गणाचे उमेदवार / मतमोजणी प्रतिनिधी यांना प्रवेश दिला जाणार नाही.एक फेरी संपल्यानंतर त्या फेरीचे उमेदवार / मतमोजणी प्रतिनिधी मतमोजणी कक्षाच्या बाहेर गेल्यानंतर च पुढच्या फेरीचे उमेदवार / मतमोजणी प्रतिनिधी यांना मतमोजणी कक्षात प्रवेश देणेत येईल.पत्रकार उमेदवार यांची बैठक व्यवस्था मतमोजणी कक्षाच्या लगत करण्यात आली आहे.पत्रकार, उमेदवार,मतमोजणी प्रतिनिधी व सर्व मतमोजणी अधिकारी व कर्मचारी यांना मोबाईल घेऊन येण्यास सक्त मनाई आहे.फेरीनिहाय प्रवेशा करीता निश्चित करण्यात आलेल्या प्रतिनिधीची व निवडणूक मतमोजणी करीता नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांची तपासणी करुन प्रवेश देण्यासाठी पोलीस विभागाकडून योग्य त्या ठिकाणी पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.तसेच निकाल जाहीर झाल्यांनंतर कायदा व सुव्यवस्था भंग होऊ नये करीता सर्व महत्वाचे गावामध्ये पुरेसा बंदोबस्त,आचारसंहिता,भरारी पथकाची निगराणी राहणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या