प्रतिष्ठा न्यूज
मुंबई : महाराष्ट्रात नुकताच संपन्न झालेल्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने निवडून आलेल्या नवनिर्वाचित जैन नगरसेवकांचा भव्य सत्कार सोहळा एलिट प्लॅझा, मालाबार हिल, मुंबई येथे उत्साहात संपन्न झाला. सदर सत्कार सोहळा जैन प्रकोष्ठ, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्यजैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन व जैन अल्पसंख्यांक महासंघाच्या वतीने यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री श्री मंगल प्रभात लोंढा हे विशेष उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या संयोजनासाठी भाजपा जैन प्रकोष्ठ, राज्य अध्यक्ष श्री संदीप भंडारी यांनी विशेष परिश्रम घेतले
कार्यक्रमास आचार्य परमपूज्य नयन पद्म सागर जी महाराज यांच्या पावन सानिध्य लाभले. यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी जैन समाजाने राजकीय क्षेत्रात अधिक सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले. जैन समाजातील सुमारे ४० टक्के लोक आजही दारिद्यरेषेखाली जीवन जगत असल्याची खंत व्यक्त करत त्यांनी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम घटकांनी पुढाकार घेऊन योगदान देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. तसेच जैन समाजाचे स्वतंत्र व प्रभावी राजकीय अस्तित्व निर्माण करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
या प्रसंगी परमपूज्य महाराजांच्या हस्ते नवनिर्वाचित जैन नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात जैन आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष श्री ललितजी गांधी, आमदार चैनसुख संचेती तसेच आमदार श्री नरेंद्र मेहता यांनीही मनोगत व्यक्त करून जैन समाजाच्या राजकीय व सामाजिक सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले.
याच कार्यक्रमामध्ये वळीवडे (जि. कोल्हापूर) येथील श्री विश्वजीत दिगंबरे व श्री महावीर रावसाहेब पाटील यांचा व त्यांच्या कार्यकर्त्यांचाभारतीय जनता पार्टीतील पक्षप्रवेशाची घोषणा जैन प्रकोष्ठाचे प्रदेश अध्यक्ष श्री संदीप भंडारी यांनी केली. त्यानंतर त्यांच्या पक्षप्रवेशाचा संपन्न झाला. या पक्षप्रवेशासाठी जैन प्रकोष्ठाचे राज्य उपाध्यक्ष श्री रावसाहेब पाटील यांनी विशेष प्रयत्न केले.
या वेळी आमदार चैनसुख संचेती यांच्या हस्ते नूतन पक्षप्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास राज्याच्या विविध भागातून आलेले जैन नगरसेवक व, जैन प्रकोष्ठ चे महामंत्री विकास अच्छा जैनप्रकोष्ठ पश्चिम विभाग प्रमुख श्री प्रशांत गोंडाजे, भाजपा युवा मोर्चा सांगली शहराध्यक्ष श्री शांतीनाथ कर्वे श्री सुरज अथने श्री अभिजीत दिगंबरा श्री जीवन्धर चौगुले श्री महावीर पाटील तसेच वैभव पाटील, श्री कोल्हापुरे व कार्यकर्ते समाजातील मान्यवर उपस्थित होते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या