प्रतिष्ठा न्यूज
मिरज प्रतिनिधी : श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज महाराणा प्रताप चौक, मिरज येथे फोटो पूजनाचा कार्यक्रम अतिशय भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
समाजात समता, सेवा आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या संत रोहिदास महाराजांच्या विचारांचे स्मरण करत त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुधीर चापोरकर, शिवसेना महानगरप्रमुख मोहन वनखंडे सर, मा. नगरसेवक आनंदा देवमाने, मा. नगरसेवक जुबेर चौधरी, नगरसेवक संजय बापू मेंढे मा. नगरसेवक बसवेश्वर(भैय्या) सातपुते, डॉ. रविकांत पाटील,नगरसेवक सागर वनखंडे,किरण राजपूत तसेच योगेश शिरगुरकर, विनायक सूर्यवंशी, ठाणेश्वर देवमाने, सुभाष सातपुते, राजू सातपुते, अनिल सातपुते (महाराज)प्रतीक देवमाने, राहुल सातपुते, भास्कर सातपुते, श्याम भंडारे, विजय सातपुते, सुनील सातपुते, संघर्ष सातपुते,आदी मान्यवर उपस्थित होते.
समाजाला एकत्र ठेवणाऱ्या संतांच्या शिकवणीप्रमाणे आपण सर्वांनी बंधुभाव, समता आणि सेवा यांचा मार्ग स्वीकारू या, हीच जयंतीनिमित्त प्रार्थना.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या