सांगली (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टीच्या ४६ व्या स्थापना दिनानिमित्त आज सांगलीचे आमदार सुधीर दादा गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात ध्वजारोहण करून स्थापना दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
माजी जिल्हाध्यक्ष दीपक बाबा शिंदे यांच्या हस्ते पक्षध्वजाचे पूजन व ध्वजारोहण करून झाली. तत्पूर्वी, पंडित दीनदयाळ उपाध्याय आणि श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना माजी जिल्हाध्यक्ष दीपक बाबा शिंदे म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली आज भारत जागतिक महासत्ता होण्याकडे वाटचाल करत आहे. सांगलीच्या विकासासाठी आपण सर्वजण कटिबद्ध असून कार्यकर्त्यांच्या बळावरच आपण ही विकासाची गंगा घराघरांत पोहोचवत आहोत." सत्ता हे केवळ समाजसेवेचे साधन आहे, हा संस्कार भाजपने आपल्याला दिला आहे. आमदार सुधीर दादा गाडगीळ यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली विधानसभा मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी आम्ही सर्वजण एकजुटीने काम करत आहोत."
राज्य परिषद सदस्य प्रकाश तात्या बिरजे यांनी पक्षाच्या प्रवासावर प्रकाश टाकला. ते म्हणाले, "जनसंघापासून सुरू झालेला हा प्रवास आज जगातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षापर्यंत पोहोचला आहे. शिस्त, निष्ठा आणि राष्ट्रवाद हीच आपल्या कार्यकर्त्यांची खरी ताकद असून सांगलीचे योगदान यात नेहमीच मोलाचे राहिले आहे."
यावेळी शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांनी संघटनेच्या बळकटीकरणावर भर दिला. ते म्हणाले, "भाजपा ही एक प्रबळ विचारधारा आहे. सांगली शहरात 'बूथ तिथे यूथ' ही संकल्पना राबवून आपण पक्ष संघटना तळागाळापर्यंत पोहोचवत आहोत. आगामी काळात सरकारी योजनांचा लाभ प्रत्येक वंचिताला मिळवून देणे, हेच आमचे ध्येय आहे."
यावेळी जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, जिल्हा नियोजन समिती सदस्य दीपक बाबा शिंदे, भाजपा राज्य परिषद सदस्य प्रकाश बिरजे, जिल्हा सरचिटणीस विश्वजीत पाटील, स्मिता भाटकर, उदय मुळे, जिल्हा उपाध्यक्ष हेमलता मोरे, संदीप कुकडे, डॉ. भालचंद्र साठये, नगरसेवक उदय बेलवलकर नगरसेविका योगिता राठोड, मीनाक्षी पाटील, मनीषा कुकडे, मंडलाध्यक्ष राहुल नवलाई, माजी नगरसेविका उर्मिला बेलवलकर, माजी नगरसेवक विनायक सिंहासने, समाधान लोंढे, गणपती साळुंखे, मंडल उपाध्यक्ष चंदन सनदी, सदाशिव पाटील, स्नेहजा जगताप, रजनी गोखले, सुनंदा पाटणकर, नवनाथ खिलारे, सुनील भोसले, अभिषेक ठाकूर, प्रीती काळे, गौस पठाण, अजिंक्य कुलकर्णी, आदी सर्व पदाधिकारी, मोर्चा व प्रकोष्ठचे पदाधिकारी, बूथ प्रमुख,शक्ती केंद्रप्रमुख व कार्यकर्ते उपस्थित होते. 'भारत माता की जय' आणि 'वंदे मातरम्' :च्या घोषणांनी संपूर्ण परिसर भारावून गेला होता.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या