प्रतिष्ठा न्यूज/योगेश रोकडे
सांगली : “भारतीय संविधान” ७५ वे अमृत महोत्सवी वर्ष आणि हर घर संविधान – हर घर शाळा अभियान अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या प्रथम टप्प्यातील संविधान परीक्षा-2026 मध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ रविवारी (दि. १५ फेब्रुवारी २०२६) रोजी सकाळी ११ वाजता एम.एस.ई.डी.सी. सोसायटी लिमिटेड, विश्रामबाग येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पाटबंधारे विभागाचे मा. श्री. अशोक मंडले, अॅड. कृष्णा पाटील सर लेखक व मार्गदर्शक आणि सौरभ झगडे (संस्थापक)
ग्रेस कौन्सिलिंग सर्विसेस, सांगली. (करिअर आणि शिक्षण) उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी मान्यवरांनी संविधानाचे महत्त्व, नागरिकांचे अधिकार-कर्तव्य आणि विद्यार्थ्यांनी लोकशाही मूल्यांचे पालन करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे आयोजन श्री. गणेश दत्तात्रय पवार (संचालक, लक्ष्यदीप संस्था, सांगली) यांनी केले. उपस्थित विद्यार्थी, पालक व मान्यवरांच्या सहभागामुळे कार्यक्रम प्रेरणादायी व यशस्वी ठरला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या