प्रतिष्ठा न्यूज
मिरज प्रतिनिधी : मिरज विभागातील पोलीस ठाणेंकडून अंधारात व निर्मनुष्य ठिकाणी दारु पिणारे, नशा करणारे तळीरामांवर धडक कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. अशा प्रकारचे एकूण ५० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. डार्क स्पॉट कारवाई करण्यात आल्यामुळे नागरिक पोलिसांचे अभिनंदन करत आहेत.
थोडक्यात हकीकत :-
मा. भारत सरकार यांच्या "नशामुक्त भारत अभियान" चे पार्श्वभूमीवर तसेच मा. श्री. चंद्रकांतदादा पाटील, पालकमंत्री, सांगली जिल्हा यांनी दिलेल्या सूचनेनुसार सांगली व मिरज शहरातील वाढत्या नशाखोरीला अंकुश घालण्याचे अनुषंगाने अंधा-या व निर्मनुष्य ठिकाणी दारु पिणारे, नशा करणारे संशयित इसमांचे विरोधात प्रभाची व सातत्यपूर्ण कारवाईसाठी श्री. संदीप घुगे, मा. पोलीस अधिक्षक सांगली, श्रीमती कल्पना बारवकर, मा. अपर पोलीस अधिक्षक सांगली व श्री. प्रणिल गिल्डा, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, मिरज विभाग यांनी विशेष सूचना देवून प्रभावी कारवाई करुन गुन्हे दाखल करण्याबाबत आदेश दिले होते.
सदर आदेशाप्रमाणे मा. श्री. प्रणिल गिल्डा, उपविभागीय पोलीस अधिकारी, मिरज विभाग, मिरज यांनी मिरज विभागातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे संयुक्त पथक तयार करून अंधा-या व निर्मनुष्य ठिकाणी मोटारसायकलवरुन तसेच आवश्यकतेनुसार पायी गस्त करुन असे गैरप्रकार करणारे इसमांवर धडक कारवाई करण्याचे नियोजन करुन मार्गदर्शन केले होते.
त्याप्रमाणे श्री. किरण चौगुले, पोलीस निरीक्षक, प्रभारी मिरज शहर पोलीस ठाणे, मिरज, श्री. संदीप शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक, प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज व श्री. आनंदराव घाडगे, सहा. पोलीस निरीक्षक, प्रभारी-एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाणे, कुपवाड यांनी तात्काळ कारवाई करीत पोलीस ठाणेकडील डि. बी. पथकाकडील अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करुन त्यांना अंधा-या व निर्मनुष्य ठिकाणी मोटारसायकलवरुन तसेच आवश्यकतेनुसार पायी गस्त करुन दारु पिणारे, नशा करणारे संशयित इसमांचे विरोधात प्रभावी व सातत्यपूर्ण कारवाई करण्यासाठी सुचित केले होते.
मा. वरीष्ठांचे आदेशाप्रमाणे दि. १४.०२.२०२६ रोजी सायंकाळी मिरज विभागातील मिरज शहर पोलीस ठाणे, महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज व एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाणे, कुपवाड कडील प्रभारी अधिकारी यांनी डी. बी. पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचेसह मिरज विभागातील मिरज शहर परीसर व कुपवाड परीसरातील अंधा-या व निर्मनुष्य ठिकाणी पायी तसेच मोटारसायकलवरुन गस्त करीत सदर ठिकाणी दारु पिणारे, दारु पिण्याचे उद्देशाने थांबलेले, नशा करणारे तसेच अवैधरीत्या जुगार खेळणारे इसमांवर छापेमारी करुन मिरज शहर पोलीस ठाणेस ३०, महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज येथे १६ व एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाणेस ४ असे एकूण ५० गुन्हे दाखल करुन अंधा-या व निर्मनुष्य ठिकाणी दारु पिणारे, नशा करणारे, जुगार खेळणारे संशयित इसमांचे विरोधात प्रभावी कारवाई केली आहे.
मा. भारत सरकार यांच्या "नशामुक्त भारत अभियान" चे पार्श्वभूमीवर सदरच्या कारवाई प्रमाणेच यापुढेही अंधा-या व निर्मनुष्य ठिकाणी दारु पिणारे, दारु पिण्याचे उद्देशाने थांबलेले, नशा करणारे संशयीत इसमांवर सांगली जिल्हा पोलीस प्रशासनाकडून प्रभावी व सातत्यपूर्ण धडक कारवाई करण्यात येत असून नागरीकांनी अशा गैरप्रकारची माहीती पोलीस प्रशासनास डायल ११२ च्या माध्यमातून देण्याचे सांगली जिल्हा पोलीस दलातर्फे आवाहन करण्यात येत आहे.
*कारवाई करणारे पोलीस अधिकारी आणि अंमलदार*
मा. श्री. संदीप घुगे, पोलीस अधिक्षक, सांगली
मा. श्रीमती कल्पना बारवकर, अपर पोलीस अधिक्षक, सांगली
मा. श्री. प्रणिल गिल्डा, उपविभागीय पोलीस अधिकारी, मिरज विभाग यांचे मार्गदर्शनाखाली
श्री. किरण चौगुले, पोलीस निरीक्षक, प्रभारी मिरज शहर पोलीस ठाणे, मिरज
महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज श्री. संदीप शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक, प्रभारी
एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाणे, कुपवाड श्री. आनंदराव घाडगे, सहा. पोलीस निरीक्षक, प्रभारी
तसेच मिरज शहर पोलीस ठाणे, महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज व एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाणे, कुपवाड पोलीस ठाणेकडील डी. बी. पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या