प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गगनबावडा तालुक्यात राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. जिल्हा परिषद गगनबावडा गण – एक (तिसंगी) व गण – दोन (आसळज) तसेच पंचायत समिती तिसंगी व असंडोली या मतदारसंघांत इच्छुक उमेदवारांची गर्दी वाढल्याने तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सर्वच प्रमुख पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू असून, निवडणूक रणसंग्रामाची नांदी वाजल्याचे चित्र आहे.
तिसंगी जिल्हा परिषद गणासाठी महाविकास आघाडीकडून विलास पाटील यांची कन्या सोनाली विलास पाटील, तर महायुतीकडून माजी सभापती एकनाथ शिंदे यांच्या पत्नी कल्पना एकनाथ शिंदे यांची नावे सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. या दोन प्रमुख नावांसह अनेक इच्छुक उमेदवार तयारीत असल्याने उमेदवारीची चुरस दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.
दरम्यान, आसळज मतदारसंघातून जिल्हा परिषदेसाठी महाविकास आघाडीकडून मानसिंग पाटील, संभाजी पाटणकर, बंडू आप्पा पडवळ, राजेश पाटील, तसेच राष्ट्रवादी (शरद पवार गट) कडून प्रकाश पाटील हे इच्छुक सक्रिय झाले आहेत. दुसरीकडे महायुतीकडून उत्तम बंडागळे व आनंदा पाटील ही नावे पुढे येत असून, मैदान तापण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.
या निवडणुकीत महायुतीची एकजूट कितपत टिकणार, तसेच भाजप, अजित पवार गट, पी. जी. शिंदे आणि आमदार चंद्रदीप नरके यांची भूमिका काय असेल, यावर संपूर्ण गगनबावडा तालुक्याची राजकीय समीकरणे अवलंबून राहणार आहेत. प्रभावी एकजूट झाली तर विद्यमान राजकीय गणिते पूर्णतः बदलू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
दुसरीकडे काँग्रेसमधील इच्छुकांची संख्या वाढल्याने नेतृत्वासाठी चुरस निर्माण झाली असून, आमदार सतेज पाटील सर्व इच्छुकांना एकत्र ठेवण्यात यशस्वी ठरणार की नाराज उमेदवार बंडखोरीचा मार्ग स्वीकारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एकूणच, गगनबावडा तालुक्यातील ही निवडणूक केवळ स्थानिक राजकारणापुरती मर्यादित न राहता, जिल्हा पातळीवरील आगामी राजकीय दिशा ठरवणारी ठरणार असल्याने, येत्या काही दिवसांत राजकीय हालचाली आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या