प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगलीत पहिल्यांदाच होत असलेल्या "विवाह साज" अर्थात वेडिंग एक्सपो चे उद्घाटन सांगलीचे जिल्हाधिकारी माननीय श्री अशोक काकडे साहेब व त्यांच्या सुविध्य पत्नी यांचे हस्ते आज 17 जानेवारी 2026 रोजी सकाळी, हॉटेल ग्रेट मराठा, सांगली येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
सदर वेडिंग एक्सपो प्रदर्शनामध्ये पहिल्याच दिवशी स्टॉल धारकांनी व ग्राहकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला असून, विवाहा साठी आवश्यक असणाऱ्या, रांगोळी ,रुखवत , अलंकारा पासून हनिमून पॅकेजपर्यंत च्या सर्व सुविधा एकाच छताखाली या प्रदर्शनामध्ये ग्राहकांना मिळणार आहेत, अशा प्रकारचे प्रदर्शन हे सांगलीमध्ये पहिल्यांदाच होत असून,मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्था,महाराष्ट्र राज्य, "घे भरारी" आणि जीबीएफ यांच्या संयुक्त विद्यमाने सांगली येथील ग्रेट मराठा हॉटेल येथे प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे ते उद्या दिनांक 18 जानेवारी 2026 रोजी सकाळी 9 पासून संध्याकाळी 9 पर्यंत चालू असणार आहे, या अमूल्य संधीचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांच्याकडून करण्यात आले आहे. यावेळी विवाह साज या प्रथमच सांगलीत आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनाचे सांगलीचे जिल्हाधिकारी माननीय अशोक काकडे यांनी आपल्या भाषणातून कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.
यावेळी मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्थेचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्रसिंह पाटील प्रसिद्ध उद्योजक रवींद्र खिलारे पवार, डॉक्टर संजय पाटील, राज्य समन्वय सुधाकर पाटील, आशाताई पाटील, रेखा पाटील, कल्याणी सावंत, आश्लेषा जाधव, प्रतीक्षा जाधव, नूतन पवार, नंदिनी बिरजे, योगिता पाटील, मुक्ता पाटील- नवले, सोनल पाटील, स्मिता देसाई, तेजस्विनी सूर्यवंशी, जयश्री घोरपडे, सुप्रिया घारगे, सुजाता भगत, निशा फडतरे, सायली चव्हाण, अनिता माने, सुवर्णा माने, क्रांती कदम, शरयू पाटील, शुभदा जगदाळे, प्रणोती पाटील, उषा पाटील, विपुल पाटील, आकांक्षा पवार आदी मान्यवरांच्या सहित, अक्षय घोरपडे, सुजित पवार प्रतीक भगत, सिद्धेश्वर जाधव, बाल मुकुंद पाटील आदी मान्यवर उद्योजक उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या