प्रतिष्ठा न्यूज
हातकणंगले प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रुई जिल्हा परिषद मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार डॉ. विशाल जगदीश साजणीकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज साजणी गावातून उत्साहात पार पडला. साजणी येथील हनुमान मंदिरात दर्शन घेऊन त्यांनी प्रचाराला औपचारिक सुरुवात केली.
यावेळी युवकांचा मोठा सहभाग दिसून आला. तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेल्या “लाडकी बहीण” योजनेमुळे महिलांमध्येही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल सकारात्मक वातावरण असल्याचे पाहायला मिळाले.
प्रचारसभेत बोलताना डॉ. विशाल साजणीकर म्हणाले,
“या मतदारसंघाला बदल हवा आहे. आता उपरा नको, स्थानिकच उमेदवार हवा. जनतेच्या प्रश्नांची जाण असलेला, गावातला माणूसच मतदारसंघाचा खरा प्रतिनिधी ठरू शकतो.”
यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करत, केवळ निवडणुकीपुरते दिसणारे उमेदवार नव्हे तर कायम लोकांमध्ये राहणारा उमेदवार निवडावा, असे आवाहन केले.
तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अलीकडील निधनाबाबत भावना व्यक्त करत डॉ. साजणीकर म्हणाले,
“अजितदादांच्या जाण्याने मी स्वतः अत्यंत व्यथित आहे. त्यांच्या विचारांना पुढे नेण्यासाठी आणि त्यांच्या कार्याला खरी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मतदारांनी मला मतदान करून विजयी करावे.”
यावेळी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक व महिलांची मोठी उपस्थिती होती. साजणी येथून सुरू झालेला हा प्रचार पुढील दिवसांत संपूर्ण रुई जिल्हा परिषद मतदारसंघात जोरदार गती घेणार असल्याचे चित्र आहे
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या