प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:तासगांव अर्बन बँकेच्या पलूस शाखा कार्यालयाचे नवीन जागेमध्ये तासगांव-कराड रोड, मिनाक्षी टॉकिज नजीक,पलूस येथे गुरुवार दि. २२/०१/२०२६ रोजी श्री. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी, म्हासोलीकर महाराज,म्हासोली यांच्या हस्ते व मामासाहेब पवार बँकेचे चेअरमन प्रशांत पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शाखा शुभारंभ सोहळा संपन्न झाला.शाखा शुभारंभ कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवर,सभासद व ग्राहक यांचे संचालक विनय शेटे यांनी स्वागत केले व त्यांचे आभार व्यक्त केले. चेअरमन कुमार शेटे यांनी बँकेच्या उपस्थित सर्व सभासद व ग्राहकांना बँकेच्या आर्थिक स्थिती बाबतची माहिती दिली.बँकेने आपल्या ४५० कोटी व्यवसायाचा टप्पा पार केला असून बँकेचे ५०० कोटी व्यवसायाचे उद्दिष्ठ समोर ठेवून त्यानुसार बँकेची वाटचाल सुरु आहे.बँकेचे अध्यक्ष यांनी उपस्थितांना सभासद व ग्राहक यांना विनंती केली की,आज रोजीपासून सर्व बँकिंग व्यवहार हे नवीन शाखा कार्यालयातून सुरु करणेत येत आहेत.बँकेच्या यशामध्ये आपणा सर्वांचे मोलाचे योगदान लाभलेले आहे.बँकेच्या उत्तरोत्तर प्रगतीसाठी आपले असेच योगदान कायम राहील याची आम्हास खात्री आहे.आपले सर्व आर्थिक व्यवहार हे आपल्या तासगांव अर्बन बँकेतूनच करावेत असे सर्व नागरीकांना आवाहन केले.या प्रसंगी बँकेचे चेअरमन कुमार शेटे,व्हा.चेअरमन अनिल कुत्ते,संचालक महेश्वर हिंगमिरे,सदाशिव शेटे,अरुण पाटील, विनय शेटे,उदय वाटकर,धोंडीराम सावंत,रामशेठ शेटे,राजेंद्र माळी, सौरभ हिंगमिरे,उदय डफळापूरकर (सीए),अॅड. आशिष अडगळे, संचालीका श्रीमती सविता पैलवान, सौ.उमा हिंगमिरे, मॅनेजमेंट समिती सदस्य अवधूत गडकर,रविंद्र देवधर, प्रदिप पवार बँकेंचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत कुलकर्णी व इतर मान्यवर तसेच कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या