मिरज: सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधत भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा स्वातीताई सुशांत खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा मिरज ऑफीस येथे फोटोपूजन करून त्यांच्या विचारांचा जागर घालण्यात आला. यावेळी सावित्रीमाई फुले यांनी महिलांच्या शिक्षणासाठी व सामाजिक समतेसाठी केलेल्या कार्याची तसेच त्यांनी दिलेल्या महान बलिदानाची सविस्तर माहिती स्वातीताईंनी उपस्थितांना दिली.
“सावित्रीमाईंनी दिलेला शिक्षण, स्वाभिमान व संघर्षाचा वसा आपण सावित्रीच्या लेकी या नात्याने पुढे घेऊन जाणे ही आपली जबाबदारी आहे,” असे आवाहन त्यांनी भाजपा महिला मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले.
यावेळी ज्येष्ठ नेत्या व माजी कॅबिनेट मंत्री व विद्यमान आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या अर्धांगिनी सुमनताई खाडे, स्नुषा रसिकाताई खाडे, महिला मोर्चाच्या विविध पदाधिकारी त्यामध्ये अनिता हारगे, प्राजक्ता कोरे, साधना माळी, कपिला पाटील, ज्योती कांबळे, रेखा शेजवळ, प्राची पाठक, रूपाली देसाई, रूपाली राऊटे, अनिता कोरे, अनिता कांबळे, व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रम प्रसंगी उपस्थितांनी सावित्रीमाई फुले यांच्या विचारांचे अनुकरण करण्याचा संकल्प व्यक्त केला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या