प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : वाचणे, लिहिणे, विचार करणे आणि स्वतःला सादर करणे यातून माणूस पगल्भ होत जातो. या गोष्टी शक्य होईल त्या महामानवांच्या चरित्र वाचनातून. जिजाऊ ब्रिगेड व म.से.सं.चे इतर कक्ष यांनी वेळोवेळी महामानवांच्या विचारांचा जागर केला आहे. याचाच एक भाग म्हणजे सावित्री-जिजाऊ दशरात्रोत्सव. दि. 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती व दि.१२ जानेवारी राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब जयंती. या दहा दिवसांच्या कालावधीमध्ये या उत्सवाचे नियोजन केले जाते. या दोन्हीही महामाता संपुर्ण देशाचे प्रेरणास्थान आहेत. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही हा दशरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. अशी माहिती सेवा संघाचे सांगली जिल्हा अध्यक्ष आर एस पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी डॉ विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रतापसिंह पाटील, चंद्रकांत पाटील, शंकर रकटे, विठ्ठल चव्हाण, शिवाजी मोहिते, कुंदन पवार, सचिन ठाणेकर, नितीन पवार, पूजा पाटील, मृणाल पवार उपस्थित होते.
या उत्सवात विचारवंतांचे व्याख्यान, आरोग्य शिबिर, वधू-वर मेळावा, आश्रमांना भेटी व मनोरंजन यासारखे भरगच्च कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. या उपक्रमात नागरिकांनी सहभागी होऊन आंनद घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे.
शनिवार दि. ३ जाने. २०२६
वेळ : दु. ४ वा.
कार्यक्रम : सावित्री जिजाऊ दशरात्रोत्सव उद्घाटन सोहळा व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती.
: शिवमती डॉ. साधना पाटील
प्रमुख वक्त्या - (संचालिका व समुपदेशक, यशवंत व्यसनमुक्ती केंद्र, शिराळा सांगली)
कार्यक्रम अध्यक्षा
: शिवमती मिना शेशू (संचानिका संपदा ग्रामीण महिला संस्था (संग्राम)
सहभाग
: जिजाऊ ब्रिगेड, सांगली.
स्थळ : मराठा सेवा संघ सांस्कृतिक भवन, सांगली.
रविवार दि. ४ जाने. २०२६
वेळ: स. १० वा
कार्यक्रम : ब्लड डोनेशन कॅम्प
प्रमुख पाहुणे
शिवश्री डॉ. मोहन पाटील. (अध्यक्ष मराठा समाज, सांगली)
ठिकाण : मराठा सेवा संघ सांस्कृतिक भवन, सांगली.
सोमवार दि. ५ जाने. २०२६
वेळ : दु. १२ वा.
कार्यक्रम ।
: हसत-खेळत विज्ञान
सहभाग
स्थळ : अंधश्रद्धा निर्मूलन
: मल्लेवाडी शाळा, मल्लेवाडी.
वेळ: स. ९.३० वा.
कार्यक्रम २
: सेंद्रिय हळद उत्पादन तंत्रज्ञान
सहभाग
: डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि परिषद
स्थळ : श्री हणमंतराव पटेद फार्म बसरगी (जत)
मंगळवार दि.६ जाने. २०२६
वेळ : सायं. ५ वा.
कार्यक्रम १
: पत्रकारांचा सत्कार
सहभाग : तांनुबाई बिरजे पत्रकार परिषद, सांगली.
स्थळ : मराठा सेवा संघ सांस्कृतिक भवन, सांगली.
वेळ : दु. ३.४५ वा.
कार्यक्रम २ : वेगवेगळ्या पिकांवरील कीड व व्यवस्थापन
सहभाग : डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि परिषद
स्थळ : माणदेश फार्म, गावारचीच मळा, आटपाडी
बुधवार दि.७ जाने. २०२६
वेळ : सायं. ५.३० वा.
कार्यक्रम : साऊ-जिजाऊ लघुपट महोत्सव
सहभाग
: संगितसूर्य केशवराव भोसले सांस्कृतिक परिषद
स्थळ : मराठा सेवा संघ सांस्कृतिक भवन, सांगली.
गुरुवार ८ जाने. २०२६
वेळ : स. १० वा.
कार्यक्रम
: सर्व संघटना
स्थळ : मराठा सेवा संघ, सांस्कृतिक भवन, सांगली.
शुक्रवार ९ जाने.२०२६
वेळ : स. १० वा.
कार्यक्रम : पर्यटन करिअर
सहभाग
: मराठा उद्योजक कक्ष, सांगली
स्थळ : मराठा सेवा संघ, सांस्कृतिक भवन, सांगली
शनिवार दि. १० जाने. २०२६
वेळ : स. १० वा.
: इव्हेंट मॅनेजमेंट
सहभाग : मराठा उद्योजक कक्ष, सांगली.
स्थळ : मराठा सेवा संघ सांस्कृतिक भवन, सांगली.
रविवार दि. ११ जाने. २०२६
वेळ : सायं. ४ वा.
कार्यक्रम : संत तुकाराम महाराज यांचे अभंगवाचन
सहभाग : जिजाऊ ब्रिगेड, सांगली.
स्थळ : विश्वास नर्सिंग होम, तिसरा मजला मंगळवार पेठ, पश्चिम माधवनगर.
सोमवार दि. १२ जाने. २०२६
वेळ : राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब जयंती
कार्यक्रम : राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांची जयंती अभिवादन
स्थळ : मराठा सेवा संघ, सांस्कृतिक भवन, सांगली
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या