प्रतिष्ठा न्यूज
सांगली महाराष्ट्र : डिजिटल सक्षमीकरण आणि वीज वापरातील पारदर्शकता वाढवण्याच्या उद्देशाने अदाणी एनर्जी सोल्युशन्सने अलीकडेच सांगली फेस्टिव्हल 2025 मध्ये ग्राहकांसाठी माहितीपर उपक्रम राबवला. भारतभर स्मार्ट मीटरचा वापर वाढवण्याच्या व्यापक मोहिमेचा भाग असलेल्या या उपक्रमाला उत्सवात सहभागी झालेल्या नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमात स्मार्ट मीटर (टाइम ऑफ डे – टीओडी मीटर) चे थेट प्रात्यक्षिक दाखवण्यात आले, ज्यामुळे हे मीटर कसे काम करतात हे नागरिकांना प्रत्यक्ष पाहता आणि समजता आले. माहिती फलक आणि संवादात्मक सादरीकरणांद्वारे हे तंत्रज्ञान सोप्या पद्धतीने समजावून सांगण्यात आले. तसेच खास मोबाइल अॅपची माहिती देण्यात आली, ज्यामध्ये वीज वापराची थेट माहिती, तात्काळ सूचना मिळतात, हे दाखवण्यात आले. स्मार्ट सुविधांचे फायदे लोकांपर्यंत पोहोचावेत यासाठी माहितीपत्रकांचे वाटपही करण्यात आले.
नागरिकांकडून या उपक्रमाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. “टीओडी मीटरमुळे वीज किती वापरली जाते हे समजते आणि अचानक येणारी मोठी वीज बिले कशी टाळता येतात, हे जाणून घेण्यासाठी लोक उत्सुक होते,” असे अदाणीच्या एका कर्मचाऱ्याने सांगितले. “या तंत्रज्ञानामुळे वीज वापरावर स्पष्ट माहिती आणि नियंत्रण मिळते हे लोकांना खूप आवडले,” असेही त्यांनी नमूद केले.
*स्मार्ट मीटरचे फायदे*
स्मार्ट मीटरमुळे घरगुती आणि व्यावसायिक वीज वापर व्यवस्थापन अधिक सोपे आणि प्रभावी होत आहे. त्याचे मुख्य फायदे पुढीलप्रमाणे आहेत:
अचूक आणि पारदर्शक वीज बिल: स्मार्ट मीटरमुळे हाताने रीडिंग घेण्याची गरज राहत नाही आणि अंदाजे बिले येत नाहीत. ग्राहकांनी जितकी वीज वापरली आहे, तितकेच अचूक बिल भरावे लागते.
तत्काळ वीज वापराची माहिती: मोबाइल अॅपद्वारे वीज किती वापरली जात आहे, हे लगेच पाहता येते. त्यामुळे अनावश्यक वीज वापर ओळखता येतो आणि वीजेची बचत करता येते.
जलद सेवा आणि तक्रार निवारण: वीज खंडित होणे किंवा तांत्रिक बिघाड याची माहिती वीज कंपनीला दूरूनच मिळते. त्यामुळे दुरुस्ती लवकर होते आणि सेवा अधिक विश्वासार्ह होते.
ग्राहक सक्षमीकरण आणि पर्यावरण संरक्षण: कमी मागणीच्या वेळेत वीज वापरल्यास खर्च कमी होतो आणि कार्बन उत्सर्जनही कमी होते, ज्यामुळे पर्यावरणाची सुरक्षा होते.
सांगली फेस्टिव्हल 2025 मधील हा उपक्रम अदाणी एनर्जी सोल्युशन्सच्या ग्राहक-केंद्रित सेवा आणि शाश्वत भविष्याप्रती असलेल्या वचनबद्धतेचा भाग आहे. “स्मार्ट मीटर ही केवळ उपकरणे नाहीत, तर पारदर्शकता, कार्यक्षमता आणि ग्राहक सक्षमीकरणाचे साधन आहेत,” असे एईएसएलच्या प्रवक्त्याने सांगितले. “हे लोकांना त्यांच्या वीज वापरावर नियंत्रण देण्यास मदत करते आणि भारताच्या डिजिटल ऊर्जा परिवर्तनाला पाठबळ देते.”
रिवॅम्प्ड डिस्ट्रीब्युशन सेक्टर स्कीम अंतर्गत भारतात 25 कोटींपेक्षा अधिक स्मार्ट मीटर बसवण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे लोकांमध्ये जनजागृती आणि विश्वास निर्माण करण्यासाठी अशा स्थानिक पातळीवरील उपक्रम खूप महत्वाचे आहेत. उत्सवातील एका नागरिकाने सांगितले, “आता मी नेमकी किती वीज वापरतो हे स्पष्टपणे पाहू शकतो आणि माझे वीज बिले व्यवस्थित हाताळताना मला अधिक आत्मविश्वास वाटतो.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या