तासगाव : तासगाव येथील सानेगुरुजी नाट्यगृहात ABCD कल्चरर ग्रुप, तासगाव यांच्या पुढाकाराने सादर झालेले “वरवरचे वधू वर” हे नाटक प्रेक्षकांसाठी केवळ मनोरंजन न ठरता,आजच्या बदलत्या सामाजिक वास्तवावर भाष्य करणारा प्रभावी प्रयोग ठरला.आधुनिक काळातील विवाह जुळवण्यातील गोंधळ, करिअरचा ताण आणि सामाजिक अपेक्षा यांचे वास्तव चित्रण या नाटकातून अतिशय हलक्याफुलक्या, विनोदी शैलीत मांडण्यात आले आहे.मोहित आणि विशाखा या पात्रांच्या माध्यमातून आजच्या तरुण पिढीसमोरील प्रश्न नाटकाने नेमकेपणाने उभे केले.विनोदी संवाद,प्रसंगानुरूप संगीत आणि सहजसुंदर अभिनयामुळे प्रेक्षक खळखळून हसले,तर त्याचवेळी “लग्न म्हणजे केवळ वरवरची जुळवाजुळव नव्हे, तर परस्पर समज,संवाद आणि स्वीकार” हा महत्त्वाचा सामाजिक संदेशही प्रभावीपणे पोहोचवण्यात आला.या नाटकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते कोणत्याही एका घटकावर बोट न ठेवता,संपूर्ण समाजाच्या मानसिकतेवर आरसा धरते.त्यामुळे प्रेक्षक नुसते करमणूक घेऊन निघत नाहीत,तर स्वतःच्या विचारांवरही चिंतन करायला भाग पडतात.अशा आशयघन, विचारप्रवर्तक आणि दर्जेदार नाटकाचे तासगावमध्ये आयोजन करून ABCD कल्चरर ग्रुप,तासगाव यांनी सांस्कृतिक जाणिवा जपण्याबरोबरच सामाजिक प्रबोधनाची जबाबदारीही समर्थपणे पार पाडली आहे.त्यांच्या या उपक्रमामुळे तासगावच्या सांस्कृतिक विश्वात निश्चितच एक सकारात्मक व प्रेरणादायी भर पडली आहे.
वरवरचे वधुवर समाजाला आरसा दाखवणारे नाटक
By -
डिसेंबर ३१, २०२५
0
प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या