प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : तासगाव एसटी आगारातील अधिकाऱ्यांच्या कथित मनमानी कारभाराविरोधात महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटना आक्रमक झाली असून, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषण सुरू केले आहे. चालक–वाहकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे आगार प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.चालक–वाहकांना सेवाज्येष्ठतेनुसार आलोकन न लावणे, आलोकन वेळेवर प्रसिद्ध न करणे, वारंवार बदल्या करणे, महिला वाहकांना अतिरिक्त त्रासदायक कामे देणे,आजारी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणे, तसेच अधिकारी व पर्यवेक्षकांकडून मनमानी पद्धतीने कारभार केला जात असल्याच्या तक्रारी संघटनेने निवेदनातून मांडल्या आहेत.कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर वारंवार पाठपुरावा करूनही अपेक्षित निर्णय होत नसल्याने अखेर उपोषणाचे हत्यार उपसावे लागले,अशी भूमिका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे.कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन उपोषणाची सांगता करावी,अशी मागणी होत आहे.दरम्यान, प्रशासनाने या आंदोलनाची तातडीने दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे तासगाव आगारातील कामगार विरुद्ध प्रशासन संघर्ष चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या