प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:शब्दांची जादू,भावनांचा ओलावा आणि कवितेचा बहारदार आविष्कार… अशा अविस्मरणीय वातावरणात नभांत नाट्य संस्था, तासगाव आयोजित ‘अक्षर अक्षर तुझेच आहे’ या स्वरचित कवितांच्या मैफलीने रसिकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले.तासगाव शहरासह सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला.कवी अविनाश काठवटे यांच्या प्रसिद्ध ‘पुन्हा तोच सागर, पुन्हा त्याच लाटा’ या कवितेने मैफलीची सुरुवात झाली. पहिल्याच कवितेला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने नाट्यगृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. त्यानंतर कवी अपूर्व राजपूत, सारंग पंपटवार आणि नैनेश तांबे यांच्या बहारदार स्वरचित कवितांनी मैफलीत रंग भरला.कवितेतील विविध भावछटा, शब्दांची ताकद आणि सादरीकरणाची शैली यामुळे उपस्थित रसिकांनी कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला. विशेष म्हणजे तीन जिल्ह्यांतून रसिक प्रेक्षकांनी उपस्थिती लावत तासगावच्या सांस्कृतिक विश्वाला दाद दिली.यावेळी नगराध्यक्षा सौ विजया पाटील,उपनगराध्यक्ष प्रसाद पैलवान,बाबासो पाटील, किशोर गायकवाड यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नभांत नाट्य संस्थेचे पियुष मिर्लेकर, सई येडेकर, प्रतिक गोसावी, श्रीकुमार माळी, ओमकार वजरिणकर, चैतन्य कदम, अंकित स्वामी, गायत्री नांदवडेकर, प्रतिक मिर्लेकर, अभिषेक माळी, अथर्व जोशी आणि गणेश इंगवले यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमास डॉ. प्रतिक जाधव,आनंदबाबू औताडे, अभिजीत पवार, सुधीर पाटील, साउंडसाठी चेतन माळी, लाईटसाठी सागर जगताप व आयुब येणापुरे, भोजन व्यवस्थेसाठी राणा उर्फ आदित्य पवार, राहुल चव्हाण तसेच विघ्नहर्ता नाश्ता सेंटरचे रोहितकुमार मोरे यांचे सहकार्य लाभले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या