सांगली: केपीज चेस अकॅडमीच्या वतीने आयोजित स्वर्गीय राजमती यशवंत पवार स्मृती बुद्धिबळ महोत्सव २०२६ ला बुद्धिबळप्रेमींचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. महोत्सवाच्या चौथ्या वर्षात महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांतील तब्बल ४४९ खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे. यंदा एकाच वेळी पाच स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, विविध वयोगटांतील खेळाडूंमध्ये चुरशीच्या लढती पाहायला मिळत आहेत.
सांगलीच्या बुद्धिबळ क्षेत्रात केपीज चेस अकॅडमीने २००, ३००, ४०० आणि ५०० खेळाडूंच्या सहभागाचे टप्पे पार करत ६०० खेळाडूंच्या सहभागाची आंतरराष्ट्रीय स्पर्धाही आयोजित केली आहे. तसेच २०२४ मध्ये जागतिक बुद्धिबळ संघटनेच्या शताब्दी वर्षानिमित्त पाच गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड स्पर्धांचे आयोजन, संयोजन आणि नियोजन करण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम अकॅडमीने राबवला होता.
मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन
महोत्सवाचे उद्घाटन पीएनजी सराफ आणि ज्वेलर्सचे श्री. गणेशजी गाडगीळ यांच्या हस्ते दीपप्रज्वलन, प्रतिमापूजन आणि उद्घाटनाच्या पटावर चाल खेळून करण्यात आले. यावेळी आयडीएफसी बँकेचे शाखा व्यवस्थापक स्वप्निल दिलीप भिवरे, माजी जिल्हा परिषद सदस्य व वसंतदादा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक पी. एल. रजपूत, केपीज चेस अकॅडमीचे संस्थापक व आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ प्रशिक्षक विजयकुमार माने, पत्रकार मिलिंद देशपांडे, आदर्श शिक्षक विठ्ठल मोहिते आणि सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक उदयजी पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्पर्धेत सांगली, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, बेळगाव, सोलापूर, लातूर आदी शहरांतील खेळाडूंनी सहभाग घेतला आहे.
७ वर्षांखालील गटात राजवीर दलीया, शिवराज कामटे आघाडीवर
चौथ्या फेरीत राजवीर दलीया याने मिहीत यादवचा, तर शिवराज कामटे याने वीर गाढाचा पराभव केला. या दोघांनी प्रत्येकी चार गुण मिळवत आघाडी कायम ठेवली. आरव पाटीलला श्रेयांश पांडवने बरोबरीत रोखले.
चौथ्या फेरीअखेर आघाडीचे खेळाडू : १. राजवीर दलीया – ४ गुण २. शिवराज कामटे – ४ गुण ३. आरव पाटील – ३.५ गुण ४. श्रेयांश पांडव – ३.५ गुण
९ वर्षांखालील गटात पाच खेळाडूंची संयुक्त आघाडी
या गटात अनिरुद्ध साळुंखे, आयुष लोंढे, रितम दोशी, आदिराज डोईजड आणि सुयोग काकाणी यांनी चौथ्या फेरीत विजय मिळवत प्रत्येकी चार गुणांसह आघाडी घेतली. विवान सपकाळने संस्कार वनीरेला बरोबरीत रोखले.
चौथ्या फेरीअखेर आघाडीचे खेळाडू : अनिरुद्ध साळुंखे, आयुष लोंढे, रितम दोशी, आदिराज डोईजड आणि सुयोग काकाणी – प्रत्येकी ४ गुण.
११ वर्षांखालील गटात सहा खेळाडू आघाडीवर
या गटात विहान कोणगिरी याने विवान दासरीचा, विहान अस्पतवार याने श्रुती पांडवचा, पृथ्वीराज पाटील याने हर्षद मस्केचा, दिव्यांश तालीमणी याने गौरव कुंभारचा, ऋग्वेद कुंभार याने प्रणिता मडोलीचा, तर नारायणी घोरपडे हिने हरीश शिंदेचा पराभव केला.
चौथ्या फेरीअखेर आघाडीचे खेळाडू : विहान कोणगिरी, विहान अस्पतवार, पृथ्वीराज पाटील, दिव्यांश तालीमणी, ऋग्वेद कुंभार आणि नारायणी घोरपडे – प्रत्येकी ४ गुण.
१३ वर्षांखालील गटात चुरशीच्या लढती
या गटात आशिष मोटे, दर्श यराटे, अर्णव रहाटळ, प्रेम निचल, शिवेंद्रसिंह शिंदे आणि अर्जुन चौगुले यांनी चौथ्या फेरीत विजय मिळवून प्रत्येकी चार गुणांसह आघाडी कायम ठेवली. अव्दिक फडकेला सत्यजित नेर्लेकरने, तर अन्वय भिवरेला वेदांत बांगडने बरोबरीत रोखले.
चौथ्या फेरीअखेर आघाडीचे खेळाडू : आशिष मोटे, दर्श यराटे, अर्णव रहाटळ, प्रेम निचल, शिवेंद्रसिंह शिंदे आणि अर्जुन चौगुले – प्रत्येकी ४ गुण.
१७ वर्षांखालील गटात विक्रमादित्य चव्हाणची आघाडी
या गटात सांगलीच्या विक्रमादित्य चव्हाणने सौमित्र केळकरचा, पार्श्व लिगाडेने बेळगावच्या अंशुमन शेवडेचा, पियुष मानेने सारा हरोलेचा, तर शार्विल येडेकरने मिहीर पिंपरकरचा पराभव केला. या चारही खेळाडूंनी प्रत्येकी चार गुण मिळवत आघाडीच्या स्थानावर झेप घेतली.
चौथ्या फेरीअखेर आघाडीचे खेळाडू : १. विक्रमादित्य चव्हाण – ४ गुण २. पार्श्व लिगाडे – ४ गुण ३. पियुष माने – ४ गुण ४. शार्विल येडेकर – ४ गुण
पंचांची महत्त्वपूर्ण भूमिका
स्पर्धेचे कामकाज आंतरराष्ट्रीय पंच पौर्णिमा उपळावीकर, फिडे पंच दीपक वायचळ, राष्ट्रीय पंच करण परीट, शाहरुख कुरणे, रोहिणी तुम्मा, शांतला शेवडे (बेळगाव), नितीन माने, प्रशांत पिसे (लातूर), राज्य पंच मोहिनीराज डांगे, नाझिया पटेल, पूजा धनवडे, अनिता भोसले, अरुणा पुराणिक आणि शंकर आडम पाहत आहेत.
महाराष्ट्र आणि कर्नाटकातील ४४९ खेळाडूंच्या सहभागामुळे या महोत्सवाने सांगलीच्या बुद्धिबळ क्षेत्रातील आपले स्थान अधिक भक्कम केले आहे. लहान वयोगटांपासून १७ वर्षांखालील गटापर्यंत सुरू असलेल्या या स्पर्धांमुळे नवोदित बुद्धिबळपटूंना आपले कौशल्य दाखवण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या