मिरज प्रतिनिधी : केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलमध्ये शनिवारी विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणारा रंगतदार सांस्कृतिक महोत्सव उत्साहात पार पडला. विविध स्पर्धा आणि उपक्रमांमधून विद्यार्थ्यांनी आपल्या सर्जनशीलतेची, आत्मविश्वासाची आणि कौशल्यांची प्रभावी झलक सादर केली.
कला व सादरीकरण विभागात- नृत्य, गायन आणि एकपात्री अभिनय या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या उत्कृष्ट सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.
सर्जनशील कला विभागात- वेशभूषा, कागदकला व हस्तकला यांद्वारे विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे आणि कलात्मकतेचे दर्शन घडले.
सांस्कृतिक उपक्रमांमध्ये- गरबा व दांडिया सादरीकरणाने संपूर्ण परिसर उत्साह, रंग आणि पारंपरिक संस्कृतीच्या जल्लोषाने भारावून गेला.
साहित्यिक उपक्रमांत - वादविवाद स्पर्धेत विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर प्रभावी मांडणी करत आपली वक्तृत्वकला सिद्ध केली.
पाककला विभागातील - खाद्यपदार्थ प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी आकर्षक, पौष्टिक आणि चविष्ट पदार्थ सादर करून सर्वांची प्रशंसा मिळवली.
या महोत्सवामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या अंगी असलेल्या विविध कलागुणांना व्यासपीठ मिळाले तसेच संघभावना, नेतृत्व, सर्जनशीलता आणि आत्मविश्वास यांचा विकास होण्यास मोठी मदत झाली.याप्रसंगी शाळेचे चेअरमन मा.पृथ्वीराज पाटील , विश्वस्त ॲड .वीरेंद्र पाटील आणि समन्वयक सतीश पाटील यांनी मुलांचे कौतुक करत मुलांना प्रोत्साहन दिले. तसेच शाळेचे प्रशासक रफिक तांबोळी,उपमुख्याध्यापिका पद्मा सासनूर, समन्वयिका अश्विनी येळकर आणि सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. पालकांनीही विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणाचे मनापासून कौतुक करत अशा उपक्रमांचे स्वागत केले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या