सांगली प्रतिनिधी : नवरात्र दुर्गा माता उत्सवाच्या निमित्ताने दुसऱ्या माळेला हिंदू एकता आंदोलन संघटना महाराष्ट्र राज्य यांनी महाराष्ट्रामध्ये लव जिहादच्या माध्यमातून उध्वस्त होणाऱ्या हिंदू महिलांना धीर व न्याय देण्यासाठी आक्रमक हिंदुत्ववादी महिला संघटना सुरू करण्याचा निर्णय घेतला. सातारा, जिल्ह्यातील पहिली कट्टर हिंदुत्ववादी महिला शिवभक्त हिंदू एकता आंदोलनाचे साताऱ्याचे ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक कै. सुनील उर्फ बटू संकपाळ यांच्या मुलीची हिंदू एकताचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांनी महिला आघाडी जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीचे आज पत्र दिले.
*या वेळी बोलताना हिंदू एकता आंदोलन प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले कि,* सातारा हिंदू एकता आंदोलनाचे माजी नेते माजी नगरसेवक कै. सुनील उर्फ बटू संकपाळ यांनी अमेरिकेने शत्रुराष्ट्र पाकिस्तानला आर्थिक मदत केल्या मुळे त्याच्या रागापोटी अमेरिकन वकालतीवर बॉम्ब टाकला त्यामुळे कै. सुनील उर्फ बटू संकपाळ यांनी साडेतीन वर्ष कारावास भोगला. अशा देशभक्त आणि धर्मयोध्या ची मुलगी अस्मिता लाड हिची सातारा महिला आघाडी जिल्हाअध्यक्ष पदी नेमणूक करत असून त्या लव्ह जिहाद मध्ये अडकलेल्या महिला व मुलींना धीर व न्याय देण्याचे काम त्या करतील.
यावेळी हिंदू एकता आंदोलन शहर अध्यक्ष मा. अनिरुध्द कुंभार, नगरसेवक सागर पावसे, संतोष शेंडे, गजानन माने, पृतांजली संकपाळ, संदीप सरडे, निशा लोहार, संगीता भोसले, अक्षय शेलार, अक्षय शिंदे, निखिल राजपूत, अजिक्य संपकाळ, अविष्कार सपकाळ, शंकर माळवदे, गणेश भोसले, सुनील बुचकर, दत्तात्रय शिंदे, अजय धोगडे,शिवराज इंगवले आदि पदाधिकारी उपस्थित होते
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या