प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणूक २०२६-३१ साठी सांगली लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार संजयकाका पाटील यांनी तासगाव तालुका विकास सोसायटी गटातून सोमवारी (दि. २८) उमेदवारी अर्ज दाखल केला.युवानेते प्रभाकर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा अर्ज दाखल करण्यात आला.यावेळी तासगाव पंचायत समितीच्या सभापती सौ अरुणा पाटील,जिल्हा परिषद सदस्य शशिकांत जमदाडे,पंचायत समिती सदस्य सुनील जाधव, प्रमोद शेंडगे, महेश पाटील, माजी नगराध्यक्ष बाबासो पाटील, नितीन पाटील, मनोज पाटील, संदीप पाटील, अमित पवार, सुजय मोराळकर, सुदीप खराडे, सचिन मोहिते आदी उपस्थित होते.
तासगाव तालुक्यातील विकास सोसायट्या या शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या संस्था आहेत. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीसह शेतीपूरक उद्योगांसाठी आर्थिक सहाय्य व कर्जपुरवठा केला जातो.शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी, त्यांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी तसेच शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी काम करण्याच्या उद्देशाने सांगली जिल्हा विकास आघाडीच्या माध्यमातून आपण उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याचे संजयकाका पाटील यांनी सांगितले. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या उमेदवारीने तासगाव तालुका विकास सोसायटी गटातील निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या