सांगली प्रतिनिधी : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) सांगली शाखेच्या विशेष बैठकीत पुरोगामी आणि विवेकवादी विचारांचा जागर करणार्या नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, एम एम कलबुर्गी, आणि गौरी लंकेश यांच्या चरित्र पुस्तकांचे प्रकाशन पार पडले.
या बैठकीत 'कोण होते नरेंद्र दाभोळकर', 'कोण होते गोविंद पानसरे' 'कोण होते कलबुर्गी', 'कोण होत्या गौरी लंकेश' या चार पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
फक्त रुपये 100 मध्ये या चार पुस्तिका उपलब्ध आहेत.
याप्रसंगी अंनिसचे पूर्णवेळ कार्यकर्ते राहुल थोरात म्हणाले की, हे केवळ चार ग्रंथ नसून विवेकवाद, अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि सत्याच्या शोधासाठी दिलेल्या लढ्याचा महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहेत. डॉ. नरेंद्र दाभोळकर, कॉ. गोविंद पानसरे, प्रा. एम. एम. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश या चौघांनीही समाजातील अंधश्रद्धा, कर्मकांड आणि जातीयतेविरुद्ध खंबीरपणे आवाज उठवला.
थोरात पुढे म्हणाले की,
या पुस्तकांच्या माध्यमातून नवी पिढी या विचारवंतांच्या विचारांशी आणि संघर्षाशी जोडली जाईल, असा विश्वास आहे.
यावेळी अंनिसचे कार्यकर्ते चंद्रकांत वंजाळे, प्रा. अमित ठकार, जगदीश काबरे, डॉ. सविता अक्कोळे, गीता ठाकर, त्रिशला शहा, आशा धनाले, शोभा मधाळे उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या