प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव :संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालय,तासगाव अंतर्गत आंतरवासिता शाळा पद्मभूषण वसंतरावदादा पाटील विद्यालय, खंडोबाचीवाडी येथे ‘पोलीस काका–विद्यार्थी सुरक्षा जागृती’ कार्यक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. आर. मंडले यांच्या हस्ते भित्तीपत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘पोलीस काका विद्यार्थ्यांच्या भेटीला’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना वाहतूक नियम, रस्त्यावरील सुरक्षितता, मोबाईलचा सुरक्षित वापर, कायद्याचे पालन तसेच विविध सुरक्षा विषयांबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधत सुरक्षा आणि कायद्याशी संबंधित विविध प्रश्न विचारले. या प्रश्नोत्तरातून विद्यार्थ्यांमध्ये सतर्कता, सुरक्षिततेची जाणीव आणि जबाबदार नागरिकत्वाची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
कार्यक्रमास विद्यालयातील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी गट मार्गदर्शक प्रा. प्रमोद शेंडगे यांचे मार्गदर्शन लाभले. शुभदा पाटील यांनी प्रास्ताविक केले. रुचिता घोडके यांनी सूत्रसंचालन केले, तर अनिता माने यांनी आभार मानले. यावेळी सुमन कोळी व स्नेहल तेली उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सांगता प्रार्थनेने करण्यात आली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या