प्रतिष्ठा न्यूज / दीपक शिंत्रे
विजयपूर : जिल्ह्यातील देवरहिप्परगी तालुक्यातील जालवाद गावात घरासमोरील कट्ट्यावर झोपलेल्या तरुणाचा गळा चिरून खून करण्यात आल्याची भयंकर घटना घडली आहे.
इसाक बागवान (वय 25) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. रात्रीच्या वेळी घरासमोरील कट्ट्यावर झोपलेला असताना अज्ञात व्यक्तींनी त्याचा गळा चिरून खून केल्याचे समजते. या घटनेमुळे मृताच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, त्यांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता.
घटनेची माहिती मिळताच देवरहिप्परगी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. खुनाचे नेमके कारण तसेच आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. अधिक माहिती मिळणे बाकी आहे.
ही घटना देवरहिप्परगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या