विजयपूर : बबलेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत नोंद झालेल्या नंदी साखर कारखान्याशी संबंधित आर्थिक फसवणूक प्रकरणात पोलिसांनी सात आरोपींना अटक करून एकूण 11.32 कोटी रुपये जप्त केले आहेत.
बबलेश्वर पोलिस ठाण्यात अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रकरणाच्या तपासात 2020-21 या वर्षातील उसाचे वजन बोगस दाखवून 39 लाख 82 हजार 940 रुपयांची फसवणूक केल्याचे तसेच वाहतूक व ऊस गाळप बिले, ऊस आगाऊ रक्कम, तोडणी आगाऊ आणि वाहतूक आगाऊ रक्कम यासह एकूण 12 कोटी 33 लाख 22 हजार 793 रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपास करून सात आरोपींना अटक केली. आरोपींनी अनधिकृतपणे 93 बँक खात्यांमध्ये वळविलेली 11 कोटी 32 लाख 7 हजार 569 रुपयांची रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे.
या प्रकरणातील आरोपींचा शोध घेऊन तपासात चांगली कामगिरी केल्याबद्दल नंदी साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि शेतकऱ्यांच्या वतीने जिल्हा पोलिस अधीक्षक लक्षण निंबगगी तसेच तपास पथकातील सदस्यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या