पलूस प्रतिनिधी : श्रावणातील शेवटचा सोमवार पलूसच्या ऐतिहासिक जंगी कुस्ती मैदानामुळे यंदा विशेष गाजला. मैदानात एकापेक्षा एक सरस कुस्त्या रंगल्या असल्या, तरी संपूर्ण मैदानाचे लक्ष वेधून घेतले ते यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष प्रदीपआप्पा कदम यांनी लावलेल्या तब्बल सहा लाख रुपयांच्या मानाच्या कुस्तीने. कुस्तीप्रेमींच्या गर्दीसोबतच तालुक्यातील त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती ही मैदानातील चर्चेचा केंद्रबिंदू ठरली. त्यामुळे आखाड्यात मल्लांचा थरार आणि मैदानात मात्र प्रदीपआप्पा कदम यांच्या नावाचीच चर्चा! रंगल्याचे चित्र पहायला मिळाले.
प्रदीपआप्पा कदम यांच्या वतीने लावण्यात आलेल्या ६ लाख रुपयांच्या मानाच्या कुस्तीत माऊली जमदाडे आणि शुभम सिदनाळे आमनेसामने आले. दोन्ही पैलवानांनी ताकद आणि कौशल्य पणाला लावत कुस्तीप्रेमींना थरारक लढतीचा अनुभव दिला. सुरुवातीपासूनच दोन्ही मल्लांनी एकमेकांचा अंदाज घेत सावध डावपेच आखले. अखेर माऊली जमदाडेने एकचाक डावावर बाजी मारत शुभम सिदनाळेवर विजय मिळवला.
या कुस्तीच्या प्रत्येक डावाला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता. मात्र, कुस्तीच्या थरारासोबतच मैदानाच्या कानाकोपऱ्यात एकच नाव वारंवार ऐकू येत होते—प्रदीपआप्पा कदम!
सहा लाखांची कुस्ती; कुस्ती क्षेत्राला मोठे पाठबळ
कुस्ती हा महाराष्ट्राच्या मातीतला पारंपरिक खेळ. या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या बक्षिसांच्या कुस्त्या आयोजित करण्याची परंपरा कायम ठेवत प्रदीपआप्पा कदम यांनी यंदाही मोठे बक्षीस जाहीर केले. त्यामुळे युवा पैलवानांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. त्यांच्या या उपक्रमामुळे पलूसच्या कुस्ती मैदानाला आणखी प्रतिष्ठा मिळाली असल्याची चर्चा कुस्तीप्रेमींमध्ये होती.
मैदानात अनेक नामवंत आणि दिग्गज पैलवानांच्या प्रेक्षणीय कुस्त्या रंगल्या. प्रत्येक लढतीत पैलवानांनी आपले कौशल्य दाखवत उपस्थितांची दाद मिळवली. मात्र, सहा लाखांच्या मानाच्या कुस्तीभोवती निर्माण झालेली उत्सुकता आणि प्रदीपआप्पा कदम यांच्या नावाची चर्चा संपूर्ण मैदानावर ठळकपणे जाणवत होती.
कार्यकर्त्यांची गर्दीही ठरली चर्चेचा विषय
कुस्ती मैदानात प्रदीपआप्पा कदम यांच्या कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली. पलूससह संपूर्ण तालुक्यातून असंख्य कार्यकर्ते आणि समर्थक मैदानावर दाखल झाले होते. त्यामुळे मैदानात कुस्तीच्या थरारासोबतच प्रदीपआप्पा कदम यांच्या संघटनशक्तीचीही चर्चा रंगली.
एका बाजूला आखाड्यात पैलवानांच्या कुस्त्या रंगत होत्या, तर दुसऱ्या बाजूला मैदानाबाहेर आणि प्रेक्षकांमध्ये प्रदीपआप्पा कदम यांच्या नावाचीच चर्चा होती. त्यामुळे यंदाचे जंगी कुस्ती मैदान अनेक अर्थांनी लक्षवेधी ठरले.
यावेळी पलूस कुस्ती कमिटीचे कार्याध्यक्ष उल्हास पाटील, आशिष सूर्यवंशी, शुभम निकम यांच्यासह तालुक्यातील प्रदीपआप्पा कदम यांचे असंख्य कार्यकर्ते, कुस्तीप्रेमी, मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यामुळे श्रावणातील शेवटचा सोमवार संपला असला, तरी “पलूसच्या मैदानात यंदा फक्त कुस्त्या रंगल्या नाहीत, तर प्रदीपआप्पा कदम यांच्या नावाचीच चर्चा रंगली,” अशी प्रतिक्रिया कुस्तीप्रेमींमधून व्यक्त होत होती.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या