प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:कवठेएकंद येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालय, तासगाव अंतर्गत शालेय आंतरवासिता स्नेहसंमेलन, पारितोषिक वितरण व सदिच्छा समारंभ उत्साहात पार पडला.मुख्याध्यापक सुधीर शिंदे प्रमुख पाहुणे तर डॉ. डी. टी. खजूरकर अध्यक्षस्थानी होते. यावेळी बी.एड. प्रशिक्षणार्थी कु. तृप्ती पोतदार यांच्या भित्तिपत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले. आंतरवासिता कालावधीत राबविण्यात आलेल्या शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.सौ. सारिका पवार, सौ. साधना पाटील व कु. सुप्रिया मोहिते यांनी आंतरवासितेतील अनुभव व्यक्त केले. एस. एम. माळी यांनी प्रशिक्षणार्थींच्या कार्याचे कौतुक केले. अध्यक्षीय भाषणात डॉ. डी. टी. खजूरकर यांनी प्रत्यक्ष शालेय अनुभव हा शिक्षक होण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगितले.कार्यक्रमास प्राचार्य डॉ. आर. बी. म्हस्के, डॉ. ए. एस. चिखलीकर, एस. आर. शिंदे, आर. एस. मिरजकर यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी व बी.एड. प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या