प्रतिष्ठा न्यूज / योगेश रोकडे
मिरज : शालेय जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत मातोश्री तानुबाई दगडू खाडे इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मिरजच्या अमर मलमे याने उल्लेखनीय कामगिरी करत रौप्यपदक पटकावले. त्याच्या या यशामुळे खाडे स्कूलच्या क्रीडा क्षेत्रातील यशात आणखी एका मानाच्या तुऱ्याची भर पडली आहे.
फ्रीस्टाइल कुस्तीच्या १९ वर्षांखालील मुलांच्या गटात अमर मलमे याने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. त्याने द्वितीय क्रमांक मिळवत रौप्यपदकावर आपले नाव कोरले.
अमरच्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष, माजी कॅबिनेट मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे, संचालिका सुमनताई खाडे, सुशांत खाडे, शाळेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वाती खाडे, मुख्याध्यापिका संगीता पाटील तसेच क्रीडा शिक्षकांनी त्याचे अभिनंदन केले.
अमर मलमेच्या यशामागे शाळेतील मार्गदर्शकांचे सातत्यपूर्ण प्रोत्साहन, सराव आणि मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. त्याच्या या यशामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी नवी प्रेरणा मिळाली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या