प्रतिष्ठा न्यूज
मिरज, दि. 29 : मिरज शहराची ऐतिहासिक आणि भव्य गणेश विसर्जन मिरवणूक यंदा मोठ्या उत्साहात, शांततेत आणि अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली. हजारो गणेशभक्तांची उपस्थिती, मोठी गर्दी, वाहतूक व्यवस्था, कायदा-सुव्यवस्था, स्वच्छता, अग्निशमन व्यवस्था तसेच विसर्जनाची संपूर्ण प्रक्रिया यांचे योग्य नियोजन करत पोलीस प्रशासन, महानगरपालिका, महावितरण, अग्निशामक विभाग आणि गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी केलेले समन्वयपूर्ण काम निश्चितच कौतुकास्पद आहे.
या सर्वांच्या अथक परिश्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शिवसेना महानगर प्रमुख मा. मोहन वनखंडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिवसेना नगरसेवक सागर मोहन वनखंडे यांच्या पुढाकाराने प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी तसेच गणेश विसर्जनासाठी योगदान देणाऱ्या घटकांचा सन्मान करण्यात आला.
यामध्ये सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा. तुषार दोशी साहेब (IPS), मिरज शहर पोलीस निरीक्षक मा. किरण चौगुले साहेब, मिरज ग्रामीण पोलीस निरीक्षक मा. अमित कुमार पाटील साहेब, वाहतूक पोलीस निरीक्षक मा. रंजीत तिप्पे साहेब, महानगरपालिका उपायुक्त सौ. स्मृती पाटील मॅडम, स्वच्छता अधिकारी श्री. सचिन वाघमोडे, आरोग्य विभागातील अधिकारी, स्वच्छता निरीक्षक श्री. नितीन कांबळे व त्यांचे कर्मचारी, तसेच महानगरपालिकेच्या अग्निशामक विभागातील अधिकारी व कर्मचारी आणि मिरज शहर महावितरणचे अधिकारी व कर्मचारी यांच्या योगदानाबद्दल विशेष कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
यासोबतच गणेश तलाव येथे गेली 40 वर्षे गणेश विसर्जनाची परंपरा जपणारे विसर्जन व्यवस्थेत योगदान देणारा घुई समाज तसेच कृष्णा घाटावरील गणेश मंडळांचे कार्यकर्ते यांचेही विशेष आभार मानण्यात आले.
प्रशासनाच्या कर्तव्यनिष्ठेला मनापासून सलाम!
गणेशोत्सवाच्या काळात अनेक अधिकारी आणि कर्मचारी आपल्या कुटुंबीयांपासून दूर राहून जनतेच्या सुरक्षिततेसाठी आणि शहरातील व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी अहोरात्र कार्यरत होते. स्वतःचा सण बाजूला ठेवून जनतेचा सण सुरक्षित आणि आनंददायी करण्यासाठी काम करणाऱ्या प्रत्येक अधिकारी-कर्मचाऱ्याचा हा सन्मान आहे.
गणेश विसर्जनाची मिरवणूक यशस्वी होणे हे कोणत्याही एका यंत्रणेचे यश नसून पोलीस प्रशासन, महानगरपालिका, महावितरण, अग्निशामक विभाग, स्वच्छता व आरोग्य विभाग, विसर्जन व्यवस्थेतील स्थानिक घटक आणि गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या समन्वयाचे यश आहे.
कारवाई झालेल्या गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करण्याची विनंती
गणेशोत्सव हा श्रद्धेचा आणि भावनेचा उत्सव आहे. मिरजेतील गणेश मंडळांचे कार्यकर्ते वर्षभर मेहनत घेऊन हा उत्सव साजरा करतात. उत्सवाच्या काळात काही मंडळांच्या कार्यकर्त्यांवर नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे.
कायदा आणि सुव्यवस्था राखणे ही प्रशासनाची जबाबदारी आम्ही पूर्णपणे मान्य करतो. मात्र, या कारवाईच्या संदर्भात संबंधित गणेश मंडळांचे कार्यकर्ते हे आपलेच मिरज शहरातील तरुण आहेत, ही बाब लक्षात घेऊन मानवी आणि सहानुभूतीच्या दृष्टिकोनातून त्यांच्या प्रकरणांचा विचार करावा, अशी विनंती शिवसेना पक्षाच्या वतीने पोलीस प्रशासनास करण्यात आली आहे.
नियमांचे पालन आणि प्रशासनाचा सन्मान राखत, ज्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी संबंधित गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना सहकार्याची आणि सहानुभूतीची भूमिका घ्यावी, अशी आमची नम्र अपेक्षा आहे.
गणेशोत्सव यशस्वी करण्यासाठी प्रशासनाने केलेले उत्कृष्ट काम आणि गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी दाखवलेली सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर समन्वय हीच मिरजेची खरी ताकद आहे.
प्रशासन आणि जनता यांच्यातील विश्वास अधिक दृढ व्हावा, हाच या सन्मानामागील प्रामाणिक उद्देश आहे.
— मा. मोहन वनखंडे सर
शिवसेना महानगर प्रमुख, मिरज
— मा. सागर मोहन वनखंडे
शिवसेना नगरसेवक, सां. मि. कु महानगरप्रमुख
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या