मिरज, दि. ३० : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी आमदार श्री. गोपीचंद पडळकर साहेब यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज मिरज येथे कार्यकर्त्यांच्या वतीने उत्स्फूर्त शक्तिप्रदर्शन करण्यात आले.
यावेळी गांधी चौक येथे मा. फारूकभैय्या जमादार यांच्या वतीने आमदार श्री. गोपीचंद पडळकर साहेब यांचे पारंपरिक पद्धतीने फेटा बांधून, घोंगडी व पुष्पहार अर्पण करून स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी मा.फारुकभैय्या जमादार,मा.फिरोजभाई जमादार ,डॉ. महेशकुमार कांबळे, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष मा. आकाराम पप्पू कोळेकर,पश्चिम महाराष्ट्र अल्पसंख्यांक मोर्चाचे मा. अस्लम पप्पू अत्तार, मा. स्वप्नील लुगडे, मा. नईम मुजावर, मा. श्रीशैल धुळशेट्टी, मा. नाना खाटीक, मा. उमेश हारगे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक उपस्थित होते. परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. उपस्थितांनी आमदार श्री. गोपीचंद पडळकर साहेब यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या