प्रतिष्ठा न्यूज / दिपक शिंत्रे
विजयपूर : श्री चिदंबर सेवा समितीच्या नेतृत्वाखाली श्री शिवचिदंबर महास्वामी यांच्या अप्रकाशित लीलाग्रंथ पठणाच्या ५०व्या वर्षाचा सुवर्णमहोत्सव श्रद्धा व भक्तिभावाने साजरा करण्यात आला. श्री शिवचिदंबर मंदिरात यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत
वे. शंकर भट जोशी कमडोळी यांच्या नेतृत्वाखाली धर्मध्वजारोहण करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर गोपूजा, अश्वपूजा यांसह विविध धार्मिक विधी पार पडले. वेदमूर्ती शंकर भट अग्निहोत्री व ११ आचार्यांच्या नेतृत्वाखाली यज्ञमंडप प्रवेश सोहळा झाला. त्यानंतर गणहोम करण्यात आला.
यानंतर गुरू चिदंबर दीक्षित यांनी कार्यक्रमाचे विधिवत उद्घाटन केले. यावेळी आशीर्वचन देताना श्री गुरू चिदंबर दीक्षित म्हणाले, “सहा कोटी शिवजप यज्ञ हा अत्यंत श्रेष्ठ आणि महत्त्वपूर्ण असून, या धार्मिक संकल्पाला स्वतःचे वेगळे महत्त्व आहे. श्री चिदंबरांचे नामस्मरण केल्यास भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात.”
या कार्यक्रमास सहकार क्षेत्रातील रामनगौडा पाटील यत्नाळ, महापौर एम. एस. करडी, मल्लिकार्जुन कुमार गडगी यांच्यासह भाविकांची उपस्थिती होती.
श्री चिदंबर सेवा समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत कुलकर्णी, उपाध्यक्ष अंबादास जोशी, सचिव व्यंकटेश जोशी, व्ही. सी. कुलकर्णी, सी. के. पाटील, राघवेंद्र जोशी संकनाळ, सुधींद्र कुलकर्णी, विजय जोशी, चिदंबर जोशी, मुकुंद हंगरगी आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या