प्रतिष्ठा न्यूज/ हातकणंगले प्रतिनिधी
मजले, ता. हातकणंगले : येथील कालकथित बळवंत भरमा कोठावळे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या स्मृतींना गौरवपूर्ण स्मरण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी गोकुळ दुध.सह. संस्थेचे संचालक, माजी आमदार डॉ.सुजित मिणचेकर, जिल्हा परिषदेचे सदस्य डॉ.वर्षा सावर्डेकर , जिल्हा परिषद सदस्य कुमार कांबळे, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ.देवानंद कांबळे,सुषवंत फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आशिष कोठावळे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत 'स्मृतीशेष बळवंत भरमा कोठावळे सेवारत्न पुरस्कार' प्रदान करण्यात आला.
स्मृतीशेष बळवंत भरमा कोठावळे यांनी कस्तुरबाई वालचंद महाविद्यालय, सांगली येथे प्रदीर्घ काळ सेवा बजावली होती. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी सुषवंत फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य (कोल्हापूर जिल्हा) यांच्या वतीने हा पुरस्कार सुरू करण्यात आला आहे.
यंदाचा 'स्मृतीशेष बळवंत भरमा कोठावळे सेवारत्न पुरस्कार' वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे कोल्हापूर येथील प्रसिद्ध मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. विरेंद्रसिंह पवार (सिटी हॉस्पीटल कोल्हापूर) तसेच मजले येथील डॉ. अनिल अथणे यांना प्रदान करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते त्यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी उपस्थितांनी स्मृतीशेष बळवंत भरमा कोठावळे यांच्या स्मृतीदिनी त्यांना अभिवादन केले, कार्यक्रमास मजले गावचे माजी सरपंच सिकंदर कोठावळे, संदीप कांबळे सर , GST अधिकारी शशिकांत माने ,प्रा.महादेव कांबळे सर, सांगलीचे उद्योजक सागर सांगलीकर, माजी वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय कवठेकर, दैनिक जनसंवादचे संपादक संजय कांबळे, सुषवंत फौडेशनचे विश्वस्त सुनिल कोठावळे, अक्षय कोठावळे तसेच हातकणंगले
परिसरातील पत्रकार,अनेक विविध क्षेत्रातील प्रमुख मान्यवर, तसेच सुषवंत फौंडेशन व पंचशिल युवक संघटनेचे सर्व पदाधिकारी ,कार्यकर्ते, नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या