सांगली : प्रभाग क्रमांक ८ मधील विजयनगर रेल्वेब्रिजखाली पिण्याच्या पाण्याच्या मुख्य वाहिनीला गळती लागल्याने तेथे नवीन पाणीपुरवठा पाईपलाईन टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामाची पाहणी अतिरिक्त आयुक्त रोकडे, उपायुक्त प्रसाद कोडगूल, पाणीपुरवठा अधिकारी चिदानंद कुरणे, मुलाणी यांनी केली.
या कामामुळे गव्हर्नमेंट कॉलनी, वानलेसवाडी, विजयनगरचा पूर्व भाग, सैनिकनगर तसेच वानलेस चेस्ट हॉस्पिटल परिसरातील नागरिकांना सलग तीन ते चार दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी याची नोंद घेऊन आवश्यक त्या प्रमाणात पाण्याची साठवण करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
काम लवकरात लवकर पूर्ण करून नियमित पाणीपुरवठा सुरू करण्याच्या सूचना संबंधित कंत्राटदाराला अधिकाऱ्यांनी दिल्या. यावेळी नगरसेवक विष्णू आण्णासाहेब माने, सदाशिव पाटील, वसंत लोखंडे, कॉ. काका पाटील तसेच अन्य पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या